Home Authors Posts by माहेश्वरी वीरसिंग गावित

माहेश्वरी वीरसिंग गावित

1 POSTS 0 COMMENTS
डॉ. माहेश्वरी गावित या लोकसाहित्याच्या अभ्यासक अाणि समीक्षक अाहेत. त्या अहमदनगर येथे राहतात. त्या 'पेमराज सारडा' वरिष्ठ महाविद्यालय येथे मराठी विषयाच्या सहयोगी प्राध्यापक पदावर १९९८ सालापासून कार्यरत अाहेत. त्यांची अादिवासी संस्कृती-साहित्य (अाणि इतर विषय) यांवर अाधारीत एकवीस पुस्तके प्रकाशित अाहेत. त्या 'अानंदोत्सव' या अांतरराष्ट्रीय संशोधनपर षण्मासिकाच्या कार्यकारी संपादक अाहेत. माहेश्वरी गावित यांना त्यांच्या कार्यासाठी 'अादिवासी समाजभूषण' या अाणि इतर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात अाले अाहे. माहेश्वरी गावित 'दहाव्या अखिल भारतीय अादिवासी साहित्य संमेलना'च्या (2015) अध्यक्ष होत्या. डॉ. माहेश्वरी गावित यांनी एमए, सेट, नेट, पीएचडी अशा पदवी मिळवल्या अाहेत. त्यांनी पीएडीसाठी 'महाराष्ट्रातील अादिवासी साहित्य - एक शोध' या विषयावर प्रबंध लिहिला होता. पुढे तो ग्रंथ रूपात प्रसिद्ध झाला. त्या ग्रंथास लक्षवेधी साहित्यग्रंथ म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 'शरदचंद्र मनोहर भालेराव स्मृती पुरस्कार' लाभला. तर 'अादिवासी साहित्यविचार' या ग्रंथास महाराष्ट्र शासनाचा 'उत्कृष्ठ वाड्मय निर्मिती पुरस्कारा'ने (2009) गौरवण्यात अाले अाहे. गावित यांनी अनेक राष्ट्रीय-अांतरराष्ट्रीय परिसंवादातून सहभाग घेतला अाहे. त्यांचे काही कार्यक्रम अाकाशवाणी अहमदनगर केंद्रावरून प्रसारित करण्यात अाले अाहेत. गावित यांनी लिहिलेले काही ग्रंथ विद्यापीठाने संदर्भग्रंथ म्हणून स्वीकारले अाहेत. त्यांनी 'चाळीसगाव-डांगाण परिसरातील अादिवासींच्या दैवतकथा अाणि दैवतगीते : लोकसाहित्यशास्त्रीय अभ्यास' हा अाणि असे इतर दोन संशोधनपर प्रकल्प पूर्ण केले अाहेत. लेखकाचा दूरध्वनी 9822414202
_Najubai_Gavit_1.jpg

नजुबाई गावित – लढवय्यी कार्यकर्ती लेखिका

नजुबाई गावित यांचे नाव भारतीय साहित्यविश्वात सशक्त आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक म्हणून घ्यावे लागेल. त्यांनी त्यांच्या साहित्यातून आदिवासींचे सर्वंकष भावविश्व साकारले. त्या वंचित, शोषित, उपेक्षित,...