1 POSTS
प्रा. महेंद्र विठ्ठल पाटील हे शिरपूर येथील एस.पी.डी.एम. महाविद्यालायाचे उपप्राचार्य आहेत. ते महाविद्यालयात राज्यशास्त्र विषयाचे प्रमुख आहेत. त्यांना पदवी स्तरावर अध्यापनाचा एकोणीस वर्षांचा अनुभव आहे.
त्यांनी 'साने गुरुजींच्या सामाजिक आणि राजकीय विचारांचा विश्लेषणात्मक अभ्यास व त्यांचे योगदान' विषयावर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून पीएचडी मिळवली. यु.जी.सी अंतर्गत 'सानेगुरुजींच्या राजकीय विचारांचा विश्लेषणात्मक अभ्यास' या विषयावर लघुशोध प्रबंध सादर केला. खानदेश राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन परिषदेने आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेत त्यांच्या संशोधन निबंधाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. त्यांची आधुनिक राजकीय विश्लेषण, राजकीय समाजशास्त्र आणि महाराष्ट्र प्रशासन (संपादित) इत्यादी तीन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचे आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय संशोधन मासिकांमध्ये दहापेक्षा जास्त संशोधन प्रसिद्ध झाले आहेत. आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय परिषद सेमिनार व चर्चासत्रामध्ये पन्नासपेक्षा जास्त संशोधन पेपर प्रकाशित झालेले आहेत. त्यांनी विविध विषयावर विभिन्न महाविद्यालय आणि विविध संस्थांनी आयोजित कार्यक्रमात 100 पेक्षा जास्त व्याख्याने दिलेली आहेत.
लेखकाचा दूरध्वनी
9422233792