4 POSTS
महादेव दिनकर इरकर यांनी मेंढपाळ, मातीकामगार ते प्राध्यापक असा प्रवास करताना एम ए एम एड्, विद्यावाचस्पती असे शिक्षण पूर्ण केले आहे. ते विरारच्या उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयात अध्यापक आहेत. त्यांचा ‘मेंढपाळ धनगर जमातीचे लोकसाहित्य’ हाच पीएच डीचा विषय होता. ते स्पर्धा परीक्षांसाठी गरीब मुलांना मोफत मार्गदर्शन करतात. प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक आणि लोकसाहित्य व लोककला यांबाबत व्याख्याने देत असतात. त्यांचे ललित व वैचारिक लेखन प्रसिद्ध आहे.