Home Authors Posts by माधवी इनामदार

माधवी इनामदार

1 POSTS 0 COMMENTS
माधवी इनामदार या आयटी कंपनीत एचआर मॅनेजर म्हणून कार्यरत होत्या. त्यांना सायकॅालॅाजी, ट्रेकिंग, संगीत आणि वाचनाची आवड आहे. त्या बाबा आमटे यांनी 1984-85 मध्ये आयोजित केलेल्या भारत जोडो सायकल अभियानात सहभागी होत्या. त्या लोकविज्ञान व अक्षरमानव आणि एकलव्य फाउंडेशन या संस्थांच्या कार्यात सहभागी असतात. त्यांचे पती राजेंद्र इनामदार आर्किटेक्ट आहेत.

फिटे अंधाराचे जाळे ! – मनोबाधेसाठी एकलव्य (Eklavya vanishes the web of depression !)

माणसांना मन मोकळे करण्याची इच्छा बऱ्याचदा असते, पण त्यांना त्यांचे म्हणणे नीट, शांतपणे ऐकून घेतले जाईल याची खात्री नसते. शिवाय, त्यांना त्यांनी कोणाला काही सांगितले तर ते ‘जज’ करतील, नावे ठेवतील अशी भीतीही वाटते. मी भावना व्यक्त करता न आल्याने कोंडमारा सहन करत जगणारी माणसे आजुबाजूला बघितली होती. त्यामुळे मला मानसिक आरोग्य हा विषय किती गंभीर आहे याची कल्पना होती. म्हणूनच, माझी इच्छा त्या विषयाशी संबंधित क्षेत्रात काम करण्याची होती...