5 POSTS
केशव साठये यांनी ‘शैक्षणिक दूरचित्रवाणी’ या विषयात पुणे विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी संपादन केली आहे. दूरचित्रवाणी आणि प्रसारमाध्यम क्षेत्रात ते गेली चाळीसहून अधिक वर्षे कार्यरत आहेत. त्यांनी EDUSAT या राष्ट्रीय दूरचित्रवाणी प्रकल्पात महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाचे समन्वयक म्हणून काम केले आहे. त्यांची आयकॉनिक पर्सनॅलिटीज, Broadcast Journalism & Digital Media (इंग्रजी), टेलिव्हिजन आणि प्रसार माध्यमे, भिनलेली माणसं (मराठी) अशी पुस्तके आहेत. त्यांनी महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या स्मार्ट या मीडिया स्कूलचे संस्थापक- संचालक म्हणून चार वर्षे काम केले आहे. ते टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या मास कॉम विभागाचे प्रमुख म्हणून काम करतात.