Home Authors Posts by कविता महाजन

कविता महाजन

1 POSTS 0 COMMENTS
कविता महाजन या प्रसिद्ध मराठी लेखिका, कवयित्री आहेत. कविता महाजनांचे शालेय शिक्षण नांदेडच्या 'प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालय' येथे झाले. त्यानंतर नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयात आणि औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले. त्यांनी मराठी साहित्य या विषयात एम.ए. ची पदवी मिळवली आहे. त्‍यांनी ब्र आणि भिन्‍न यांसारख्‍या पुस्‍तकांमधून भोवतालच्‍या सामाजिक वास्‍तवाचा वेध घेतला आहे. त्‍यांच्‍या कवितांमधूनही त्‍यांनी सामाजिक वास्‍तव अधोरेखित करण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. त्‍यांना 2008 साली कवयित्री बहिणाबाई पुरस्कारासह यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा उत्कृष्ट वाङ्‌मय निर्मितीचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला. तर 2011 साली 'रजई' या इस्मत चुगताई यांच्या लघुकथांच्या अनुवादाला साहित्य अकादमीचा भाषांतरासाठीचा पुरस्कार लाभला. त्‍यांनी 'कुहू' ही कादंबरी मल्टिमिडीया फॉर्ममध्‍ये लिहून आगळावेगळा प्रयोग केला. त्‍या कादंबरीसाठी त्‍यांनी त्रेचाळीस तैलचित्रे काढली. तथापी कविता महाजन यांचे कार्यक्षेत्र साहित्‍यापुरते मर्यादीत नाही. त्‍यांची सामाजिक कार्यकर्ता आणि चित्रकार अशीही ओळख तयार झाली आहे. लेखकाचा दूरध्वनी 98923520272

मनोरंजनाचे कल्पनादारिद्र्य

प्रत्येक क्षेत्रात 'मनोरंजन' घुसखोरी करतंय आणि 'मनोरंजन' म्हणजे काय व त्यात काय काय समाविष्ट होतं, हे ठरवणारे लोक दुर्दैवाने कल्पनादारिद्र्याच्या रेषेखालचे आहेत. त्यांच्या गरिबीविषयी...