ज्योत्स्ना रवींद्र गाडगीळ या नारदीय कीर्तनकार, पत्रकार, लेखक आणि निवेदिका आहेत. त्यांनी मार्मिक साप्ताहिकात उपसंपादक म्हणून दहा वर्षे काम केले आहे. त्या लोकमत संकेतस्थळावर भक्ती विभागप्रमुख म्हणून लेखन करतात. त्या अंबरनाथ येथे राहतात.
गिरवी येथे असलेल्या गोपालकृष्ण मंदिरातील कृष्णाची मूर्ती सुंदर तर आहेच; परंतु तिच्या पाठीमागे, म्हणजे ती मूर्ती तयार व स्थापन होण्यामागे एक कथा आहे, तीही रोचक आहे. मूर्ती धेनुसहित श्रीकृष्णाची आहे. मंदिराभोवती दगडी चुनेगच्ची तट आहे. त्या सभोवतालच्या ओवऱ्यांवर मात्र आदिलशाही वास्तुरचनेची छाप आहे. गिरवी हे गाव फलटणपासून दक्षिणेला बारा किलोमीटरवर आहे...
दुष्काळ आणि शेतकऱ्यांची आत्महत्या या विषयावर चर्चा-परिसंवाद एवढी वर्षें होऊनही त्यातून काही निष्पन्न झाले नाही. अशा वेळी अशोक देशमाने या तंत्रशिक्षित तरुणाने थेट ‘निष्काम कर्मयोग’ स्वीकारला! अशोकने आयटी क्षेत्रातील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून शेतकऱ्यांच्या भावी पिढीला उज्ज्वल भवितव्य देण्याचा ध्यास घेतला आहे. त्याचे मन पुण्यात हडपसर येथे आयटी कंपनीत नोकरी करत असतानाही गावाकडे धाव घेत असे. तो एकदा दिवाळीच्या सुट्टीत परभणी जिल्ह्यातील त्याच्या मंगरूळ गावी गेला असताना तेथील स्थानिक शेतकऱ्याने दुष्काळाला कंटाळून आत्महत्या केल्याची बातमी त्याच्या कानावर पडली. तो त्या बातमीने अंतर्बाह्य हेलावून गेला. त्याचे गाव-गावकरी-शेजारीपाजारी दुःखात असताना शहरात तो सुखात राहत आहे या विचाराने अस्वस्थ झाला. त्याला त्याचा भूतकाळ आठवला. त्याने तशी परिस्थिती अन्य मुलांवर येऊ नये म्हणून शिक्षणयज्ञ सुरू केला...