1 POSTS
जयंत जोशी हे मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत. ते ठाण्यातील ग्लॅक्सो फार्मास्युटिकल्समध्ये पस्तीस वर्षे नोकरी करून निवृत्त झाले. तेथे ते फर्मेंटेशन विभागाचे प्रमुख होते. त्यांनी कचऱ्यावरील उपाय म्हणून कचरा खाणारी बास्केट म्हणजेच किचन कंपोस्ट बास्केट बनवली. बास्केटची ज्यावेळी मागणी वाढली त्यावेळी त्यांनी त्याचे उत्पादन करून पस्तीस हजार बास्केट वितरित केल्या. त्यांनी त्यासंबंधी महाराष्ट्रभर भाषणे दिली आहेत व अजूनही चालूच आहेत. त्यांनी सोसायटी पातळीवर पंचवीस प्रकल्प सुरू केले आहेत. त्यांना ‘दि ठाणे जनता सहकारी बँके’ने ‘पर्यावरण मित्र’ हा पुरस्कार देऊन गौरवले आहे. तसेच, रोटरी क्लब (ठाणे) यांनी ‘Innovation Excellance Award’ दिला आहे.