1 POSTS
हमीद दलवाई यांनी पुण्यात मुस्लिम सत्यशोधक मंडळ ही संघटना स्थापन केली. त्यांचा जन्म मिरजोळी (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथे झाला. त्यांचा ‘लाट’ (1961) हा कथासंग्रह व इंधन (1965) ही कादंबरी तसेच, ‘मुस्लिम जातीयतेचे स्वरूप-कारणे व उपाय’ (1968) आणि ‘इस्लामचे भारतीय चित्र’ (1982) ही वैचारिक पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांचे मुस्लिम पॉलिटिक्स इन सेक्युलर इंडिया (1970) हे इंग्रजी पुस्तक होय. त्यांनी मुस्लिम समाजातील प्रबोधनकार्यास वाहून घेतले होते. त्यांचा ‘इंडियन सेक्युलर सोसायटी’च्या स्थापनेतही (1966) सहभाग होता. ते अमेरिकेत भरलेल्या ‘वर्ल्ड युनिटी कॉन्फरन्स’ला प्रतिनिधी म्हणून 1976 मध्ये गेले होते.