3 POSTS
गीता नरेंद्र जोशी यांचा गो. वि. करंदीकर यांच्या साहित्याविषयी 'लेणे प्रतिभेचे' हा समीक्षा ग्रंथ राजहंस प्रकाशनातर्फे आणि ‘डोकं शाबूत आहे’ ही कादंबरी सृजनगंध प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले आहेत. त्यांनी सोलापूर आकाशवाणी व औरंगाबादच्या एफएम चॅनलवरून विविध कार्यक्रमांचे प्रसारण केले आहे. त्यांचे लेखन तरुण भारत, सकाळ अशा वर्तमानपत्रांतून व मिळून साऱ्याजणी या मासिकामधून प्रसिद्ध झाले आहे. त्यांच्या कादंबरीला अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचा पुरस्कार मिळाला आहे.