Home Authors Posts by गणेश चंदनशिवे

गणेश चंदनशिवे

1 POSTS 0 COMMENTS
गणेश चंदनशिवे हे मूळ जालन्याचे. त्यांनी जाफराबाद येथील सिद्धार्थ महाविद्यालयातून बी ए केले. त्यांनी नाट्यशास्त्र पदवी मराठवाडा विद्यापीठातून प्राप्त केली. त्यांनी ‘लोक रंगभूमीवरील तमाशा सादरीकरणाचं बदलतं स्वरूपः एक चिकित्सक अभ्यास’ या विषयावर पीएच डी मिळवली. ते मुंबई विद्यापीठात लोककला अकादमीत विभागप्रमुख आहेत.

रियाझुद्दीन अब्दुल गनी शेख यांचे वारीनृत्य

वारकरी संप्रदायातील हरीभक्त परायण राजुबाबा शेख यांनी वारीनृत्य महाराष्ट्रात लोकप्रिय केले. वारीनृत्याची कल्पनाच त्यांची. राजुबाबा कीर्तन, अभंगगायन लहानपणापासून करत, पण त्यांना वारीनृत्याची कल्पना गुजरातचे कलावंत शेखावत यांच्याकडून मिळाली. शेखावत त्यांच्या भवनीभवई प्रयोगात पितळी परातीत नृत्य करत गात; कधी तलवारीच्या पात्यावर त्यांचे नृत्य असे. राजुबाबा यांनी ताटलीत नाचत अभंग गाण्याचा प्रयोग सुरू केला. नंतर ते डोक्यावर कळशा/हंडे यांचे तीनचार थर घेऊन नृत्यगायन करत आणि भक्तिरसात डुंबून जात. त्यांचा तो खेळ लोकप्रिय झाला...