2 POSTS
धोंडिराम दत्तात्रय पाटील हे सांगली जिल्ह्याच्या बिसूर गावचे. ते त्यांच्यावर शेती आणि माती यांचे संस्कार झाले असल्याचे सांगतात. त्यांनी शिवाजी विद्यापीठातून बी ए (हिंदी) बी.जे.सी. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यांना गारगोटीच्या कर्मवीर हिरे महाविद्यालयात बी ए, बी एड करत असताना वाचन, लेखन आणि काव्यरचना यांचा छंद जडला. त्यांनी बी ए ची पदवी मिळवल्यावर त्यांना पत्रकारिता खुणावू लागली. त्यांनी पत्रकारितेत पंचवीस वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांच्या अभ्यासाचे विषय पर्यावरण, इतिहास, संस्कृती, बदलते जनमानस, देशी खेळ असे आहेत. त्यांनी सायकलिंग करत केलेल्या स्थानिक प्रवासावर आधारीत शंभराहून अधिक लेख लिहिले आहेत. पाटील ‘अंनिस‘ चळवळीशी जोडलेले आहेत. त्यांनी गावात ‘लोकजागर’ मंच स्थापन करून त्याद्वारे लोकांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला.