Home Authors Posts by बिपिन हिंदळेकर

बिपिन हिंदळेकर

3 POSTS 0 COMMENTS
डोंबिवलीचे बिपिन हिंदळेकर हे मेकॅनिकल इंजिनीयर आहेत. त्यांनी पंधरा वर्षे नोकरी केली- ऊर्जा आणि तेल शुद्धिकरण हे त्यांचे क्षेत्र. ते समाजक्षेत्रातील नव्या नातेसंबंधांचा शोध (नेटवर्किंग) घेत असतात.

दिनेश अडावदकर ज्येष्ठ निवेदक

कर्जतचे दिनेश अडावदकर आकाशवाणीच्या मुंबई केंद्रामध्ये ज्येष्ठ निवेदक आहेत. निवेदक म्हणून निवेदन क्षेत्रात त्यांचा लौकिक मोठा आहे. त्यांना कला-भाषा, साहित्य यांची आवड लहानपणापासूनच होती. त्यांचे कविता, निबंध, स्फूट लेखन शालेय वयापासून चालू असे. प्रसिद्ध लेखक-कवींबद्दल आणि कलावंतांबद्दल त्यांच्या मनामध्ये कुतूहल कायमच राहत आलेले आहे. त्यांच्याशी पत्रव्यवहार करणे, त्यांची स्वाक्षरी घेणे, त्यांची व्याख्याने किंवा कार्यक्रम यांना हजेरी लावणे हीच त्यांची आवड. ते वर्णन करून सांगतात की माझ्या त्या वेळच्या स्वच्छंद वागण्यात शिस्त नव्हती. मधुमक्षिकेप्रमाणे ज्या फुलातून मकरंद मिळेल तेथून तो गोळा करणे, एवढेच त्या वयात ठाऊक होते...

कलाश्रम परिवाराची दखलपत्रे (Kalashram – Unique way of paying homage)

नंदकुमार आणि नंदिनी पाटील हे मुंबईतील परळचे हरहुन्नरी जोडपे. पैकी नंदकुमार हा पत्रकार – छायाचित्रकार – वर्तमानपत्रात मजकुराची मांडणी आकर्षक करू शकणारा. त्याखेरीज त्याचे इव्हेण्ट मॅनेजमेंट वगैरेंसारखे अनंत उद्योग आणि त्या साऱ्यात नंदिनीची शंभर टक्के साथ. त्याच्या वृत्तीत परोपकार व सेवाभाव घरच्या संस्कारातून मुरले गेले आहेत. त्यामुळे त्याने उद्योग-व्यवसाय म्हणून काही केले तरी ते गुण प्रतीत होतातच. तशाच भावनेतून ती दोघे मिळून पतीपत्नी ‘कलाश्रम’ नावाची संस्था चालवतात आणि 2018 सालापासून दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ‘दखलपत्रे’ देण्याचा कार्यक्रम करतात...

विद्यानिकेतन – चांगल्या मूल्यांचा आग्रह (Dombivali’s Vidyaniketan – insistence for values)

‘विद्यानिकेतन’ ही डोंबिवलीमधील इंग्रजी माध्यमातील शाळा. समाजकार्याची आवड म्हणून विवेक पंडित यांनी ती सुरू केली. शाळेला चाळीस वर्षे झाली. मराठी माणसाने ध्येयवृत्तीने चालवलेली शाळा म्हणून तिचे डोंबिवलीच्या शैक्षणिक आणि सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात वेगळे स्थान निर्माण झाले आहे. वास्तविक विवेक पंडित यांचे शिक्षण वाणिज्य व व्यवस्थापन ह्या क्षेत्रांमधील आणि त्यांचा कामाचा अनुभव इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, केमिकल, एण्टरटेनमेंट अशा क्षेत्रांमधील. ते तेथे आघाड्यांच्या कंपन्यांचे प्रकल्प सल्लागार होते. त्यातून त्यांना बऱ्यापैकी उत्पन्न मिळत असे, पण त्यांना त्यांची समाजधारणा स्वस्थ बसू देत नव्हती. त्या अस्वस्थतेतूनच ‘राजेंद्र शिक्षण संस्था’ ह्या चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ‘विद्यानिकेतन’ ह्या शाळेचा जन्म 16 जून 1985 रोजी झाला...