2 POSTS
भारती बिर्जे-डिग्गीकर या कवयित्री व लेखिका आहेत. त्या यूको बँक या राष्ट्रीयीकृत बँकेत अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी स्वेच्छानिवृत्त 2012 मध्ये पत्करली. त्यांचे ‘मध्यान्ह’, ‘नीलमवेळ’, 'अभिरामप्रहर' व ‘नक्षत्रलिपी’ हे चार कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांचा Poetry and Precincts हा इंग्रजी कवितासंग्रह 2021 मध्ये प्रकाशित झाला. रस-सिंधू आणि रस-वर्षा अशी दोन इ-बुक्स प्रसिद्ध झाली आहेत. त्या विविध दिवाळी अंक व नियतकालिकांमधून कवितालेखन करतात. त्यांनी विविध भाषांमधून कवितांचे अनुवादही केले आहेत.