अश्विनी शिंदे-भोईर यांनी एम ए चे शिक्षण घेतले आहे. त्या विरारच्या विवा महाविद्यालयात लेक्चरर होत्या. त्यांनी विविध वृत्तपत्र व नियतकालिकांतून लेखन केले आहे. त्या विरारला राहतात.
कोकणात धार्मिक महोत्सव भरपूर. जुन्या प्रथा-परंपरा घट्ट रुजलेल्या. त्यात नव्या अभिनव अशा कासव महोत्सवाची गेल्या दोन दशकांत भर पडली आहे. तो महोत्सव नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यांत साजरा होत असतो. ते कोकणचे नवे आकर्षण बनले आहे...
शिमग्याच्या म्हणजेच होळीच्या सणाच्या उत्सवातील ‘पिसईचा नकटा’ दापोलीत लोकप्रिय आहे. नकटा म्हणजे देवीचा रखवालदार. नकट्याचे सोंग घेणारी व्यक्ती लाकडी मुखवटा घालते. तो मुखवटा काजूच्या झाडाच्या खोडापासून बनवलेला असतो. तो परंपरेने चालत आलेला असतो. नकट्याचा मुखवटा पोराबाळांना भीतीदायक वाटतो...
अनंत धोंडूशेठ शिरगावकर हे अण्णा शिरगावकर या नावाने कोकण परिसरात ओळखले जात. त्यांनी शिक्षण, सहकार, कामगार संघटना, अपंगांसाठीच्या संस्था, वाचनसंस्कृती, पंचायतराज, संग्रहालयशास्त्र, कोकणच्या प्राचीन इतिहासाचा शोध अशा विविध विषयांत मैलाचे दगड ठरतील असे संशोधन व लेखन कार्य केले आहे. त्यांचा जन्म 5 सप्टेंबर 1930 गुहागरमधील विसापूर गावचा. त्यांना मृत्यू वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी 11 ऑक्टोबर 2022 रोजी आला...
नयन बारहाते यांचे व्यक्तिमत्त्व एकच एक उपाधी लावून वर्णन करणे कठीण आहे. नयन हे कमर्शियल आर्ट व पत्रकारिता या दोन्ही विषयांतील पदवीधर. त्यांचा संचार त्यांच्यात दडलेला चित्रकार, पत्रकार, मुखपृष्ठकार, कवी, संपादक आणि ‘फिलॉसॉफर’ अशा सर्व पातळ्यांवर लीलया होत असतो.
भारतातील पखवाजवादकांचे पहिलेच पखवाजपर्व भोपाळमध्ये 2013 साली आयोजित करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात पखवाजवादन करणारी गार्गी ही पहिली महिला कलाकार होती. पखवाजपर्व धृपद संस्थान भोपाळ न्यास आणि डीडी भारती यांच्या वतीने भरले होते. गार्गी देवदास शेजवळ ही महाराष्ट्राची. गार्गी मुंबई, पुणे; तसेच, भारतातील विविध ठिकाणी तिच्या गुरूंसोबत पखवाजवादन करत असते.