Home Authors Posts by आशुतोष गोडबोले

आशुतोष गोडबोले

55 POSTS 0 COMMENTS

नांदगावचे खंडेश्वर मंदिर

शिवालय भारतात गावोगावी, अगदी पाच-पंचवीस उंबऱ्यांच्या गावामध्येही असते. मंदिरांची नावेही भक्तांनी प्रेमाने व गाव परिसराशी संबंध राखून ठेवलेली असतात- कोठे सोमेश्वर, कोठे कोंडेश्वर, कोठे कोळेश्वर अशी ! अमरावती जिल्ह्यात तर गावाचे नावच शंकरावरून दिले गेले आहे - नांदगाव खंडेश्वर...

भाऊबीज (Bhaubij)

कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजेच भाऊबीज. त्या दिवशी बहीण भावाला तिच्या घरी जेवायला बोलावते आणि त्याला ओवाळते. त्या प्रसंगी भाऊ बहिणीला ओवाळणी म्हणून द्रव्य (पैसे), वस्त्र किंवा एखादी वस्तू प्रेमाने देतो.

दीपावली – सण प्रकाशाचा! (Deepawali)

दीपावली हा भारतात सर्वत्र साजरा होणारा बहुधा एकमेव सण आहे. पावसाळा संपून नवी पिके हाती आल्यानंतर शरदऋतूच्या ऐन मध्यात, आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात, तो येतो.

बलिप्रतिपदा – दिवाळी पाडवा (Balipratipada – Diwali Padwa)

कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस बलिप्रतिपदा म्हणून पुराणातील बळीराजाच्या स्मरणार्थ साजरा होतो. तो दिवाळी पाडवा म्हणून ओळखला जातो. दिवाळीतील पाडवा हा साडेतीन मुहुर्तांपैकी एक मानला गेला आहे.

लक्ष्मीपूजन (Laxmipoojan)

केवळ पैसा म्हणजे लक्ष्मी नव्हे. सन्मार्गाने मिळवलेला आणि त्याच मार्गाने खर्च होणारा पैसा यालाच लक्ष्मी म्हणतात. स्वच्छता, सौंदर्य, रसिकता, उद्योगप्रियता, नैतिकता, प्रामाणिक श्रम असतील तिथे लक्ष्मी आकर्षित होते आणि वास्तव्य करू लागते. लक्ष्मी सर्व प्रकारचे ऐश्वर्य देणारी असून तिची आठ रूपे आहेत.

नरक चतुर्दशी (Narak Chaturdashi)

आश्विन वद्य चतुर्दशीला नरक चतुर्दशी असे म्हणतात. पौराणिक कथेनुसार या दिवशी कृष्‍णाने नरकासूर राक्षसाचा वध केला होता. त्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान केले जाते. अभ्‍यंगस्‍नानापूर्वी कारिट नावाचे फळ फोडण्‍याची परंपरा महाराष्‍ट्रात अनेक ठिकाणी आढळते.

अभ्यंगस्नान (Abhyangsnan)

अंगाला तेल, उटणे व अत्तर लावून उष्णोदकाने (गरम पाण्याने) स्नान करणे याला अभ्यंगस्नान करणे म्हणतात. त्याला मांगलिकस्नान असेही नाव आहे. ती चाल प्राचीन काळापासून भारतात आणि आणि इतरही देशांत आहे.

धनत्रयोदशी (Dhanatrayodashi)

आश्विन वद्य त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी. त्या दिवशी यमराजाला प्रसन्न करण्यासाठी दीपदान करतात. या दिवसाला यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी उंच जागी तेलाचे दिवे लावतात.

वसुबारस (Vasubaras)

वसुबारस (गोवत्सद्वादशी) हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तुत: तो सण वेगळा आहे. वसुबारस या शब्दातील वसू म्हणजे धन (द्रव्य), त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी.
_NIKET_PAVASKAR_1.jpg

निकेत पावसकर – हस्‍ताक्षर संग्राहक

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे येथील निकेत पावसकर हा तरुण हस्ताक्षरे व स्‍वाक्ष-या गोळा करण्‍याच्‍या छंदाने वेडावला आहे. तो गेल्या बारा वर्षांपासून विविध क्षेत्रांत नावलौकिक मिळवलेल्या...