2 POSTS
अशोक बोंडे हे परतवाड्याच्या सुंदराबाई कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून निवृत्त झाले. त्यांनी एम ए, बी कॉम, बी एड अशा पदवी मिळवल्या. पण नाटकवेड ही त्यांची ओळख. त्यांनी एकांकिका- तीन अंकी नाटकांतून कामे केली, त्यांचे एकपात्री प्रयोग देशी-परदेशी झाले, त्यांनी चित्रपटांत भूमिका केल्या. त्यांचे साहित्य प्रसिद्ध आहे. त्यांच्या ‘अचलपूरची नाट्यपरंपरा’ या ग्रंथास अंकूर साहित्य संघाचा विशेष संशोधन पुरस्कार मिळाला आहे.