2 POSTS
प्रा. आनंद कृष्णा मेणसे हे बेळगावच्या जी एस एस कॉलेजमधून प्राचार्य म्हणून 2017 साली निवृत्त झाले. त्यांचा विषय भूगर्भशास्त्र. ते सामाजिक व राजकीय क्षेत्रांत डाव्या विचारांचे संघटक व कार्यकर्ते म्हणून वावरले. त्यांचा तसा संबंध अनेक संस्थांशी आहे. त्यांचे लेखन विपुल आहे – ते वर्तमानपत्रांत आणि पुस्तिका व पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाले. त्यांनी नियतकालिकांचे संपादनही केले आहे – ते सध्या ‘साम्यवादी वीकली’ साप्ताहिकाचे संपादक आहेत.