1 POSTS
अमोल केरकर या रिझर्व बँकेतून अधिकारी पदावरून निवृत्त झाल्या. त्या रिझर्व बँक ऑफ इंडिया एम्प्लॉईज असोसिएशनच्या दीर्घकाळ कार्यकर्ती आहेत. त्या स्त्री मुक्ती संघटनेच्या संस्थापक सदस्यही आहेत. त्यांचा विविध जनचळवळींशी संबंध आहे. त्या स्त्री मुक्ती संघटनेच्या ‘प्रेरक ललकारी’ या मासिक मुखपत्राच्या संपादक- मंडळ सदस्य आहेत. त्या ‘प्रेरक ललकारी’ मासिकात जगभरातील विविध घटना, समस्या, प्रवाह व त्यांच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक पैलूंचा आढावा घेणारे सदर पस्तीस वर्षापासून नियमित लिहितात. त्यांचे ‘जागतिक सत्ताकारण- एक दृष्टिक्षेप’ हे पुस्तक ‘ग्रंथाली’तर्फे प्रकाशित झाले आहे.