1 POSTS
अमित गद्रे यांनी दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून एम एस सी पदवी मिळवली आहे. ते वीस वर्षांपासून कृषी पत्रकारितेत कार्यरत आहेत. त्यांनी ई- टिव्ही मराठीच्या अन्नदाता कार्यक्रमात काही वर्षे काम केले आहे. ते सकाळ माध्यम समूहाच्या अॅग्रोवन या कृषी दैनिकामध्ये मुख्य उपसंपादक आहेत. त्यांचे कृषी, देशी गोवंश, पर्यावरण, ग्रामविकास हे अभ्यासाचे विषय आहेत. त्यांची 'देशी गोवंश' आणि 'शाश्वत शेती विश्वासभाऊंची' ही दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या देशी गोवंश पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीला भारतीय कृषी संशोधन परिषदेचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.