अंबरीश प्रकाश सणस यांनी कृषी कीटकशास्त्र विषयात पीएच डी पदवी मिळवली आहे. ते डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी कीटकशास्त्र विभागात संशोधन सहयोगी म्हणून कार्यरत आहेत.
प्रभुआळी हे दापोली शहराचे मध्यवर्ती ठिकाण. त्या आळीची ख्याती उत्सव, प्रथा-परंपरा यांचा वारसा जपणारा, गजबजलेला भाग म्हणून आहे. प्रभुआळी हे नाव पडण्याचे मुख्य कारण म्हणजे त्या ठिकाणी प्रधान व सुळे हे प्रभू म्हणजे सीकेपी ग्रामस्थ यांचे वास्तव्य होते. या जुन्या संदर्भाखेरीज दुसरा महत्त्वाचा पदर आहे. तो म्हणजे आळीत असलेले ‘प्रभू’ श्रीरामचंद्राचे मंदिर ...