आपल्या हयातीतच दंतकथा बनण्याचे भाग्य फारच थोड्या कलाकारांच्या वाट्याला येते. जागतिक कीर्तीचे चित्रकार आणि छायाचित्रकार केकी मूस यांच्या वाट्याला हे भाग्य आले. महाराष्ट्रातच नव्हे...
मध्ययुगीन मराठी साहित्यात रुक्मिणीच्या स्वयंवराची कथा वारंवार लिहिली गेली. आद्य मराठी कवयित्री महदाइसा उर्फ महदंबा हिने ‘मातकी रुक्मिणी स्वयंवर’ हे आख्यानकाव्य लिहिले आहे. रामदेवराय यादवाने त्याच्या पदरी असलेल्या कवी नरेन्द्राकडे, त्याने लिहिलेले ‘रुक्मिणी स्वयंवर’ त्याच्या नावावर करावे म्हणून आग्रह धरला मात्र नरेन्द्र व-हाड प्रांतात निघून गेला अशी आख्यायिका आहे. नंतरच्या काळात लिहिलेले आणि आजही लोकप्रिय असलेले रुक्मिणी स्वयंवर म्हणजे संत एकनाथांचे ‘रुक्मिणी स्वयंवर’...