10 POSTS
आदिनाथ हरवंदे हे रत्नागिरीच्या जांभारी गावचे. ते 'औद्योगिक विकास व गुंतवणूक महामंडळात' एकतीस वर्षे कामास होते. ते जनसंपर्क विभाग प्रमुख पदावरून 2002 साली निवृत्त झाले. त्यांनी महाराष्ट्रातील प्रमुख नियतकालिके आणि दिवाळी अंक यांमध्ये 1975 पासून सातत्याने लेखन केले. क्रीडा क्षेत्र त्यांच्या विशेष आवडीचे. क्रिकेट परीक्षणासाठी त्यांनी देशांतर्गत आणि देशाबाहेर अनेक दौरे केले. त्यांनी धावपटू, विश्वचषक क्रिकेटचा जल्लोष, कसोटी क्रिकेट ते एकदिवसीय क्रिकेट, खेलरत्न महेंद्रसिंग धोनी, चौसष्ट घरांचा बादशहा - विश्वनाथ आनंद अशी क्रीडासंदर्भात पुस्तक लिहिलेली. त्यात 'लालबाग' आणि 'जिगीषा' या दोन कादंब-याही आहेत. त्यांच्या लेखनास अनेक पुरस्कार प्राप्त असून त्यांना सचिन तेंडुलकर याच्या हस्ते 'ज्येष्ठ क्रीडा पत्रकार' हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
लेखकाचा दूरध्वनी
9619845460