Home Search

संस्कृत भाषा - search results

If you're not happy with the results, please do another search

भाषा: लोकसंस्कृतीचे वाहन (Culture expresses itself through Language)

10
भाषा हे लोकसंस्कृतीचे वाहन आहे. भाषेचा जन्म लोकसंस्कृतीतून होत असतो. लोकसंस्कृतीतील वस्तूंचा जसजसा लोप होऊ लागतो तस तसा त्या संदर्भातील भाषेचाही र्‍हास होऊ लागतो व भाषा नवे रूप घेते.

राज्याचे भाषासंस्कृती धोरण (Maharashtra State’s Language & Cultural Policy)

4
महाराष्ट्राचे मराठी भाषाधोरण व संस्कृतिधोरण सतत काही महिने चर्चेत असे. आता तो मुद्दा साहित्य-संस्कृती क्षेत्रातून हद्दपार झालेला दिसतो. एवढे ते विश्व सोशल मीडियाने व्यापले आहे आणि त्यांचे त्यांचे ग्रूप आत्ममग्न होऊन गेले आहेत.

मराठी भाषा आणि बदलत गेलेली मराठी संस्कृती

बदलत्या जगात मराठीचा, किंबहुना कोणत्याही स्थानिक भाषेचा विचार अगदी वेगळ्या पद्धतीने करावा लागणार आहे. भाषा हे संस्कृतीचे मुख्य वाहन असते असा समज पूर्वापार आहे....

भाषा धोरण व संस्कृतिधोरण तयार करणे हे सरकारचे काम नव्हे!

महाराष्ट्राचे मराठी भाषाधोरण व संस्कृतिधोरण गेले काही महिने चर्चेत आहे. त्याआधी अनुक्रमे नागनाथ कोतापल्ले व आ. ह. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखालील समित्यांनी सरकारला धोरणाचे शिफारशीवजा...
bhavna_pradhan_01

जगातील भाषांवर संस्कृतचा प्रभाव

युरोपात सर्वत्र पसरलेल्या जिप्सींच्या रोमा बोलीभाषा हिंदीच्या प्राथमिक अवस्थेतून निघाली आहेत, याची अनेक उदाहरणे देता येतील. रोमा भाषेत काही मराठी, गुजराती, पंजाबी शब्द आहेत....

संस्कृत महाकवी कालिदास (Great Sanskrit Poet)

कालिदास हा महाकवी मानला जातो. त्याच्या कार्यकाळाविषयी विद्वानांमध्ये एकवाक्यता नाही. इसवी सनपूर्व पहिल्या शतकापासून ते इसवी सनाच्या सातव्या शतकापर्यंतचा वेगवेगळा कालावधी, कालिदासाचा कार्यकाळ म्हणून वेगवेगळ्या विद्वानांनी नोंदवलेला आहे. त्याच्या जन्मस्थानाविषयीही ठोस अशी माहिती उपलब्ध नाही. बहुतांश विद्वानांच्या मते, उज्जयिनी ही त्याची जन्मभूमी होय. कालिदासाने चाळीसहून अधिक ग्रंथांची रचना केली, पण त्या सर्व रचना करणारा कालिदास हा एकच नव्हता तर, कालिदास नावाचे अनेक कवी असल्याचाही एक मतप्रवाह आहे...

वैभवशाली वसई आणि घाटी लोकसंस्कृती (How Western Maharashtra’s ‘ghati’ people influenced Vasai’s mainly Christian...

वसईच्या एकूण लोकसमुदायामध्ये घाटी म्हणजे देशावरील माणसे बहुत आहेत. तशी पंचवीस हजारांपेक्षा जास्त कुटुंबे त्या भागात असावीत असा अंदाज आहे. ते लोक मुख्यत: सातारा जिल्ह्याच्या माणदेशातील आहेत. ते गेल्या दोन-तीन शतकांपासून तेथे वास्तव्यास येत गेलेले आहेत. ते लोक मेंढपाळ म्हणून भटकंती करत ठाणे जिल्ह्यामध्ये प्रथम आले व पुढे येऊन वसईत स्थिरावले. वसई ही त्यांच्या पारंपरिक लोकगीतांमध्ये वत्सापूर, बांदुपुरा, बहादुरपुरा, गुलछनाबाद आणि बाजीपूर अशा नावांनी आलेली दिसते...

धरणगाव – बाजार व संस्कृती यांनी उत्सव संपन्न ! (Dharangaon – can culture prevail...

धरणगाव हे शहरवजा गाव जळगाव जिल्ह्याच्या मूळ एरंडोल तालुक्यातील सर्वात मोठे गाव होय. ते मोठे असल्यामुळे, खरे तर, धरणगाव हेच तालुक्याचे गाव वाटे. त्याप्रमाणे एरंडोल तालुक्याचे विभाजन 2008 मध्ये होऊन स्वतंत्र धरणगाव तालुका अस्तित्वात आला. धरणगावची नगरपालिका 1867 मध्ये स्थापन झाली होती...

भाषादूत मॅक्सिन बर्नसन

2
मॅक्सिन बर्नसन या मूळ अमेरिकन रहिवासी. त्या मॅक्सिनमावशी म्हणून सातारा जिल्ह्याच्या फलटण परिसरात माहीत आहेत. त्यांनी तेथील लहान मुलांना शिकवले. नंतर प्रौढपणी, त्या ‘टीआयएसएस’च्या हैदराबाद शाखेत प्राध्यापक या नात्याने भाषाविषयक कौशल्ये शिकवत आहेत. त्या त्यांची मायभूमी अमेरिका सोडून कायमच्या भारतात आल्या आणि त्यांना मराठी भाषेचे प्रेम लागले. त्यांनी मराठीकरता मोठे कार्य करून ठेवले आहे...

मराठी भाषा-साहित्य : अचलपूरचे योगदान

अचलपूर तालुक्याने मध्यप्रदेश या हिंदीभाषिक राज्याच्या सीमेवर असतानासुद्धा मराठी भाषा केवळ जगवली नव्हे तर वाढवलीसुद्धा आहे. अचलपूर परिसरातील बोलीचे सौंदर्य, तिचे उच्चारविशेष, रूपविशेष, तिचे आगळेपण भाषातज्ज्ञसुद्धा मान्य करतात. मूळात अचलपूरला मोठी वाङ्मयीन परंपरा लाभलेली आहे. ती मराठी भाषेच्या वृद्धीकरता पूरक ठरलेली आहे...