Home Search
अहिल्यादेवी - search results
If you're not happy with the results, please do another search
एकनाथ आव्हाड – दापूर ते दिल्ली…
एकनाथ आव्हाड यांना ‘साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार’ घोषित झाला. त्यांचा समावेश आघाडीच्या बाल साहित्यकारांमध्ये होतोच. पुरस्काराने त्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यांनी त्यांचा जीवनप्रवास नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील दापूर या छोट्या खेड्यातून सुरू केला. नरेंद्र पाठक यांनी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्यावर त्यांच्याशी गप्पा मारण्याचे ठरवले. कायम शाळेत, पुस्तकात आणि मुलांमध्ये रमणारा हा सरस्वतीपुत्र; त्यांनी त्यांच्या बालपणापासूनची कथा सांगितली आहे...
धनगरी लोककलांच्या संवर्धनाचा अनोखा अविष्कार
धनगरी लोककला संवर्धनासाठी एक दिवसाचे शिबिर कोल्हापूरजवळ कसबा बावडा येथे झाले. धनगरी लोककलांमधील पंचवीसाहून अधिक प्रकार सुमारे अडीचशे कलाकारांनी सादर केले. तो अनोखा व अफाट आविष्कार ठरला. तीन संस्थांनी एकत्र येऊन एवढा मोठा घाट घातला होता. हालमत सांप्रदाय मंडळ (कुपवाड), शिवाजी विद्यापीठाचे राजर्षी शाहू लोक संस्कृती केंद्र आणि कसबा बावडा येथील बिरदेव धनगर समाज मंडळ या त्या तीन संस्था...
शेवगावची वीस गावे पाण्यासाठी तहानलेली !
शेवगाव तालुक्यातील वीस गावांची पाणी योजना पंचवीस वर्षे झाली तरी प्रत्यक्षात आलेली नाही; मात्र वीस गावांसाठी पाणी आंदोलन झाले. जायकवाडी धरण बांधताना सरकारने शेवगाव तालुक्याकरता धरणातील 3.8 टी.एम.सी. पाणी राखून ठेवले जाईल असे आश्वासन दिले होते. त्यासाठी पंप ‘ताजनापूर’ या गावी बसवला जाणार होता, म्हणून त्या योजनेला ‘ताजनापूर लिफ्ट योजना’ हे नाव पडले. त्यासाठी आंदोलने, चळवळी, संघर्ष सुरू झाला आणि अद्यापही सुरूच आहे...
घटस्थापना ते अक्षय्य तृतीया: पाणी, पाणी !
नवरात्रीत कुंभाची म्हणजे घटाची स्थापना केली जाते. त्या दिवशी तलावांची पूजा असते, तलावांच्या पाण्याचे हिशोब लावले जातात. ते पाणी येथील सजीव सृष्टीसाठी वर्षभर वापरणे आहे याची ती आठवण असते. त्याला अनुसरून पाण्याचे व्यवस्थापन ठरते. अक्षय्य तृतीयेला घटाचे दान करण्यास सांगितले आहे. ज्या समाजाजवळ भरलेला घट दान करण्याइतके पाणी शिल्लक असेल, तो समाज समृद्ध राहतो. आश्विन महिन्यातील घटस्थापनेच्या दिवशी समाजाच्या हाती असणारे पाणी काटकसरीने वापरत वापरत वैशाख महिन्यातील अक्षय्य तृतीयेपर्यंत शिल्लक ठेवावे असा तो संकेत आहे...
बार्शीचा अंबरीषवरद भगवंत
लोककथेप्रमाणे विचार केला, तर बार्शीचा भगवंत पंढरीच्या विठ्ठलाहून जुना आहे असे जाणवते. भक्ताच्या परित्राणासाठी तो भगवंत शंख, चक्र, गदा व पद्मसहित त्याच्या लाडक्या लक्ष्मीला पाठीवर घेऊन पंढरीच्या विठ्ठलाच्या आधीपासून अद्भुत अशा बार्शीमध्ये उभा आहे.
चौगाव आमचा पारच बदलला! (Changing Face of Chaugaon Village)
माझे गाव चौगाव. चौगाव-गोताणे म्हटले, की लक्षात येते ते धुळे जिल्ह्याच्या, धुळे तालुक्यातील चौगाव. नाही तर सटाणा गावाजवळ एक चौगाव-रातीर आहे, चोपडा तालुक्यात एक चौगाव-लासूर आहे. माझे गाव मालेगावपासून साधारण चाळीस किलोमीटर उत्तरेला आणि नासिक जिल्ह्याच्या सीमेपासून सात-आठ किलोमीटर अंतरावर आहे. ते ईराज नदीच्या काठावर डोंगरउतारावर वसले आहे.
फड मंडळींचे महाजनपूर (Mahajanpur)
महाजनपूर नावाचे गाव नासिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यात येते. सध्या महाजनपूर, भेंडाळी अन् औरंगपूर ही तीन गावे म्हणजे नकाशावरील एक त्रिकोण आहे. त्या तिन्ही गावांचे...
सच्च्या राज्यकर्त्या : अहिल्याबाई होळकर
अहिल्याबार्इ होळकर यांच्याबद्दल इतिहासात कमी माहिती उपलब्ध आहे. मराठा इतिहासातील कर्तबगार स्त्रियांच्या कामगिरीचा लेखाजोखा घेता लक्षात येते, की जिजाबाई, येसूबाई, महाराणी ताराबाई, उमाबाई दाभाडे,...
आता नजर जळगाव विद्यापीठावर
सोलापूर पाठोपाठ जळगावला हे घडणे अपेक्षितच होते. तेथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठास बहिणाबार्इंचे नाव द्यावे अशी आग्रही मागणी सुरू झाली आहे. सोलापूरचे वादंग ही अक्षरश:...
विद्यापीठ नामांतर आणि तारतम्य
विद्यापीठांच्या, रेल्वे स्थानकांच्या आणि विमानतळांच्या नावांवरून वाद सुरू झाले, की काही लोकांना वैताग येतो. मग असे लोक वेगळीच भूमिका घेतात. ‘नकोच कोणाचे नाव द्यायला!’...