२००४ सालापासून शासनाने एकाही नव्या मराठी माध्यमाच्या शाळेला मान्यता दिलेली नाही. २००८ साली जाहिरात देऊन शासनाने फी आकारून प्रस्ताव मागवले आणि २००९मध्ये प्रत्येक प्रस्ताव नाकारणारे पोस्ट कार्ड प्रत्येकाला पाठवले. कोणतेही कारण न देता आणि पैसे परत न करता. तरीही नियमाप्रमाणे आधी शाळा सुरु करून नंतर प्रस्ताव पाठवलेल्या कित्येक शाळा आजही चालू आहेत. पालक आपली मुले तेथे दाखल करीत आहेत आणि खेडोपाडी लोक स्वखर्चाने शासकीय अनुदानाची वाट न पाहता या शाळा चालवीत आहेत. या शाळा आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत, पण लोकांची जिद्द कायम आहे.

आजही या इंग्रजी शाळांच्या धर्तीवर विना अनुदान तत्वावर शासनानाकडे मान्यता मागत आहेत आणि शासन वेळोवेळी दिशाभूल करणारी कारणे देत तोंडाला पाने पुसते. इंग्रजी शाळांना अनुदान द्यावे लागत नाही म्हणून मागेल त्याला शाळा काढण्याची परवानगी दिली जाते. त्या शाळांच्या कारभारावर, फी आणि अन्य विविध मार्गांनी केल्या जाणा-या लूटमारीवर शासन कोणतेही नियंत्रण ठेऊ इच्छित नाही. पालकांना मराठी शाळा हव्या असूनही, तसेच त्यांनी आपली मुले स्व-खुशीने मराठी शाळेत घातलेली असूनही या शाळांवर मात्र बंदीचे फतवे निघतात आणि त्या शाळा चालविणा-यांना तुरुंगवाससुद्धा भोगावा लागतो.
– विजया चौहान
शिक्षण हक्क समन्वय समिती आणि मराठी अभ्यास केंद्र.
{jcomments on}
About Post Author
दिनकर गांगल हे ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलचे मुख्य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्यांनी पुण्यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्यांनी आकारलेली ‘म.टा.’ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्यांना ‘फीचर रायटिंग’ या संबंधात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय (थॉम्सन फाउंडेशन) पाठ्यवृत्ती मिळाली आहे. त्याआधारे त्यांनी देश विदेशात प्रवास केला.
गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्यासारख्या व्यक्तींच्या साथीने ‘ग्रंथाली’ची स्थापना केली. ती पुढे महाराष्ट्रातील वाचक चळवळ म्हणून फोफावली. त्यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी ‘ग्रंथाली’च्या ‘रुची’ मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत ‘ग्रंथाली’ची चारशे पुस्तके त्यांनी संपादित केली. त्यांनी संपादित केलेल्या मासिके-साप्ताहिके यांमध्ये ‘एस.टी. समाचार’चा आवर्जून उल्लेख करावा लागेल. गांगल ‘ग्रंथाली’प्रमाणे ‘प्रभात चित्र मंडळा’चे संस्थापक सदस्य आहेत.
साहित्य, संस्कृती, समाज आणि माध्यमे हे त्यांचे आवडीचे विषय आहेत. त्यांनी त्यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि ‘स्क्रीन इज द वर्ल्ड’ अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांना महाराष्ट्र सरकारचा ‘सर्वोत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती’चा पुरस्कार, ‘मुंबई मराठी साहित्य संघ’ व ‘मराठा साहित्य परिषद’ यांचे संपादनाचे पुरस्कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल ‘यशवंतराव चव्हाण’ पुरस्कार लाभले आहेत.