Home मंथन

मंथन

‘थिंक महाराष्ट्र’ केवळ माहिती संकलन चाहत नाही तर समाजात विचारप्रवर्तनही घडवू इच्छिते. मंथन या सदरामध्‍ये अभिप्रेत आहे सद्यकालीन विषयावरील टिकाटिप्‍पणी. ‘मंथन’साठी पाठवण्याच्या लेखामध्ये माहितीचे व विचारांचे नावीन्य असावे. विविध विषयांवरील वि‍विध व्‍यक्‍तींचे लेख येथे प्रसिद्ध होतील. ते मते खणखणीत व निर्भीड रीत्या मांडलेले असावेत. ते समाजाची धारणा व्हावी ये हेतूने लिहिलेले असावेत. त्‍यावर समाजात ‘विचारमंथन’ व्‍हावे ही अपेक्षा आहे.

निवडणूक पद्धत चुकीची ! (Electoral system may be improved to have good representatives)

0
इतिहास पाहता असे दिसून येईल, की चुकीच्या व्यक्तींना राष्ट्रप्रमुख म्हणून निवडल्यामुळे बहुतेक सर्व युद्धे झाली. पूर्वी राजे राज्य करायचे. ते राजे म्हणून जन्मायचे तरी किंवा युद्ध जिंकल्यामुळेच राजे व्हायचे. म्हणजे जनतेने त्यांना निवडण्याचा प्रश्नच नव्हता. बाय चान्स, काही राजे चांगले राज्य करत तर काही युद्धखोर असत. पण सध्या, लोकशाहीमध्ये निवडणुकीने राष्ट्रप्रमुख निवडतात...

बहिष्कृत भारत : दलितत्वाची नवी जाणीव (Bahishkrut Bharat- Babasaheb Ambedkar’s thought breaking...

बाबासाहेब आंबेडकर त्यांचा अभ्यास पुन्हा सुरू करण्यासाठी लंडनला 1920 साली जुलै महिन्यात गेले. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समध्ये प्रवेश घेतला. बाबासाहेब स्वत: शिक्षण घेत असतानाही भारतात काम करणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांना मार्गदर्शन करत राहिले. त्यांनी जर्मनीलाही प्रवास केला. तेथे त्यांनी बॉन विद्यापीठात संस्कृतचा अभ्यास केला. लंडनमध्ये, त्यांनी विद्यार्थी संघटनेच्या मेळाव्यात ‘भारतातील जबाबदार सरकारच्या जबाबदाऱ्या’ नावाचा विचारप्रवर्तक शोधनिबंध सादर केला. त्यांची मुख्य चिंता भारतातील एक तृतीयांश लोकसंख्येतील अस्पृश्य आणि बहिष्कृत लोकांचे भवितव्य ही होती...

देव/नवस/बकरे… आणि धाराशिवचा दर्गा

धाराशिवजवळ दहा-पंधरा किलोमीटर अंतरावर गड देवधरी नावाचे लहानसे खेडे आहे. डोंगराच्या खाली, अगदी दरीत असावे असे. त्या ठिकाणी नव्याने निर्माण झालेला दर्गा होता. आधी तेथे काही नव्हते, पण एका हुशार माणसाने त्याची वार्षिक जत्रा सुरू केली. त्याला गावच्या जत्रेचे स्वरूप मिळाले. म्हणायला तो देव कुणाचा तर मुस्लिमांचा आणि कंदुरी कोणाची तर वरिष्ठ हिंदूंची ! भारतीय समाज असा संमिश्र कौतुकाचा, भाविकतेने भारलेला आहे ! दर्ग्याला नवस बोलून कंदुरी करणारी हजारो कुटुंबे आहेत. त्यांच्या मनात, डोक्यात कोणताही धर्म नसतो. मजा अशी की देव, धर्म, इच्छा, नवस, बकरे, श्रद्धा यांचे अफलातून संयुग तयार झाले आहे...

निवडणूक पद्धतीचा तराजू दीडदांडीचा (Democratic Elections Method Needs to be Modified)

भारतातील निवडणूक पद्धत पक्षपाती आहे. ती जास्त मते मिळवणाऱ्या पक्षाला प्रमाणाबाहेर जागा बहाल करते, तर कमी मते मिळवणाऱ्या पक्षांना मतांच्या प्रमाणापेक्षा फार कमी जागा देते. ती पद्धत अल्पमतातील पक्षांवर अन्याय करते. ती निवडणूक पद्धत मतदारांवरही अन्याय करणारी आहे. जरा जुना डेटा उदाहरणाद्वारे स्पष्ट करतो. ज्या दहा टक्के दिल्ली मतदारांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मते दिली, त्यांना एकही प्रतिनिधी विधानसभेत पाठवता आला नाही. म्हणजे त्यांच्या मतांची किंमत शून्य ठरली- ती मते पूर्णपणे वाया गेली ...

स्त्रीपुरूष तुलना – काल आणि आज (Comparing Men and Women – Yesteryears...

ताराबाई शिंदे यांचा ‘स्त्रीपुरूष तुलना’ हा निबंध सन 1882 मध्ये प्रकाशित झाला. एका विधवा स्त्रीने केलेल्या भ्रूणहत्येमुळे खवळून उठलेल्या आणि त्या स्त्रीला धारेवर धरणाऱ्या समाजावर धारदार लेखणीने ताराबाईंनी या निबंधात अक्षरश: कोरडे ओढले आणि त्यावर मीठही चोळले. हिंदू शास्त्र-पुराणांविषयी आणि देवादिकांविषयी तर त्यांचे विचार असे जहाल आहेत की ते वाचताना आज त्या हयात नाहीत हे लक्षात येऊन हायसे वाटते. त्या स्वदेशी उद्योगधंद्यांच्या -हासाचीही चिकित्सा करतात...

उच्च शिक्षण, संशोधन – काही प्रश्न काही उत्तरे…

देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे झाली. मात्र शिक्षणाचे मूळ उद्दिष्ट समजून घेतले जात नाही. शिक्षण हे पदवी-सर्टिफिकेट घेण्यासाठी अन् पर्यायाने नोकरीसाठी गरजेचे म्हणून घेतले जाते. ज्ञान मिळवण्यासाठी शिक्षण हे मूळ उद्दिष्ट बाजूला राहते. त्यामुळे शिकवणारे, शिकणारे या सर्वांची दिशाभूल होते. सगळे लक्ष मार्क्स, श्रेणी, पर्सेंटेज यांकडे लागलेले. परीक्षांचे नियोजनदेखील त्या उद्दिष्टाने केले जाते. कोणतीही परीक्षा विद्यार्थी काय, कसे शिकला हे तपासत नाही...

शिक्षण कशासाठी- हे समजेल का?

शिकवण्याची नव्हे तर शिकण्यासंबंधीची आव्हाने या शतकात वाढत जाणार आहेत. भारतीय शिक्षणव्यवस्था ‘टीचिंग’चा विचार करते; सगळा भर अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर असतो. विद्यार्थी काय व किती शिकला याचा विचार फारसा नसतो. त्याच्या शिक्षणाचे मूल्यमापन ज्या परीक्षांद्वारे होते त्याही कुचकामाच्या आहेत. शास्त्र, विज्ञान समजून घेणे खूप कठीण नाही, पण ते तसे सोपेदेखील नाही ! शिकणे याचा अर्थ पुस्तकातून माहिती गोळा करणे, दिलेला अभ्यासक्रम पूर्ण करणे हा नव्हे ...

उमटू दे एखादी स्मितरेषा ! (Let there be smile !)

माणसाला एकटा असताना, त्याच्या मनाला, मनापासून जे करायला आवडते तो त्याचा छंद. समाज माध्यमांचे अधिराज्य असलेल्या सध्याच्या काळात मनोरंजनाची समीकरणे बदलली आहेत. व्यक्तीला काय आवडायला पाहिजे याचा विचार करायला वाव न ठेवता, त्याच्यावर तथाकथित ‘मनोरंजन’ आदळले जाते. काळाच्या ओघात, आम जनता त्याच्या अधीन झालेली दिसते. या सध्याच्या ‘हलक्या फुलक्या’ मनोरंजनाबाबत गांभीर्याने विचार करायला पाहिजे...

सोशल मीडिया : वरदान की बुमरँग ? (Social Media : a...

संवाद माध्यमांच्या विपुलतेनंतर माणसे जोडली जाण्याऐवजी दुरावत चालली आहेत. संध्याकाळी घरी एकत्र जेवण करत दिवसभराच्या घटना एकमेकांना सांगणारे कुटुंबीय त्यांच्या त्यांच्या खोल्यांत ज्याचा त्याचा हँडसेट हातात घेऊन किंवा पीसीवर बसलेले आढळतात. लोकांतील परस्परसंवाद वाढला आहे. मात्र त्याच वेळी माणूस टोकाचा आत्मकेंद्री, प्रसंगी स्वार्थी आणि एकलकोंडाही झालेला दिसतो. सोशल मीडियाचे नकारात्मक परिणाम विवेकीपणे टाळून केवळ सकारात्मक लाभ घेणे शक्य आहे...

मध्यमवर्गीय बौद्धांची जबाबदारी

0
दलित पँथरच्या बहराच्या काळात आणि त्यानंतरही बराच काळपर्यंत, बौद्ध वस्तीत होळी, गणपती, नवरात्र असे सण सार्वजनिक रीत्या साजरे करण्याची कोणाची टाप नव्हती. हिंदू देवतांचे आणि चालीरीतींचे आम्हा बौद्धांच्या घरांतील अस्तित्व समूळ नष्ट करणे हे आमचे परमकार्य होते. त्याची एक झिंग होती. बावीस प्रतिज्ञा अमलात आणणे हे आमचे जीवनसाफल्य होते. आता, त्याच बौद्ध वस्त्यांत तरुणाई आंबेडकर जयंतीच्या बेफाम मिरवणुका डीजे लावून संघटित करते. सगळे रस्ते, गल्ल्या निळ्या होतात. नेत्रदीपक रोषणाई आणि भीमगीते यांनी माहोल उत्साहाने ओसंडत असतो...