स्तोत्र म्हणजे भक्ताने त्याच्या आराध्य दैवताला उद्देशून म्हटलेले स्तुतीपर गीत. स्तोत्रामध्ये श्रद्धा, भक्ती, प्रेम, निष्ठा, परम कारुण्य, वात्सल्य, ज्ञान, वैराग्य, सुलभता, मृदुभाव व्यक्त केलेले असतात. भक्तिरसाने ओथंबलेली, रसालंकारांनी नटलेली स्तोत्रे नादमधुर असतात. स्तोत्र हा भक्तीचा एक प्रकार असून तो भगवंताचा कृपाशीर्वाद मिळवण्याचा जवळचा मार्ग आहे. भक्त आणि देव यांच्यात सामंजस्य निर्माण होण्यासाठी तो उत्तम मार्ग आहे. असे मानतात. शत्रू, रोग, राक्षसरुपी प्रवृत्ती यांच्यापासून बचाव करण्याची शक्ती स्तोत्रानेच प्राप्त होते. त्यामुळेच काही स्तोत्रांना तारक मंत्रांचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
(आदिमाता, जानेवारी २०१६ वरून उद्धृत)