ताम्हण हे महाराष्ट्राचे राज्यपुष्प! ते जारूळ किंवा बोंडारा या नावांनीदेखील ओळखले जाते. त्याचे शास्त्रीय नाव लॅजिस्ट्रोमिया (Lagerstroemia) असे आहे. लिथ्रेसी किंवा मेंदी कूळातील हा सपुष्प वृक्ष. त्याला तामण, बोंडारा, बोंद्रा, बुंद्रा अशी इतर नावेही आहेत.
मला जंगलातून हिंडताना ताम्हणाचे फूल अनेकदा दिसे. मात्र त्या फुलाला ताम्हण म्हणतात, याबाबत माहिती नव्हती. एकदा आम्ही उन्हातान्हात जंगल तुडवड चाललो होतो. गर्द सावली असलेल्या एका झाडाखाली आम्ही विश्रांती घ्यायला थांबलो. सहज वर लक्ष गेले. पाहतो तर अख्खे झाड फुलांनी नटलेले!
ते झाड साधारण गोलसर, डेरेदार होते. खोडा-फांद्यांची साल पिवळसर, करड्या रंगाची, गुळगुळीत. पेरूच्या सालीसारखी! सालीचे पातळ, अनियमित आकाराचे पापुद्रे निघालेले होते. फिकट रंगाचे डाग पडलेले. पाने लांबट आणि टोकदार होती. पानांच्या अग्रभागाला रंग गडद हिरवा होता. तर पानाच्या उलट्या, अर्थात खालील बाजूचा रंग फिकट हिरवा होता. अगदी परफेक्ट कलर कॉम्बिनेशन! ते वेगळे फुलझाड बघायला मिळाल्याच्या आनंदात थकवा पळून गेला. मी गुराख्यांना त्या झाडाची ओळख विचारली. “याझलं ‘नाण्याचं झाड’ सांगत्या’, बाकी नाय ठाऊक!” एकाने जुजबी माहिती दिली. ”याला ‘बोंडारा’ म्हणत्यात भाऊ.” सरपणाची मोळी घेऊन निघालेली बाई म्हणाली. मला बोंडारा म्हणजेच ताम्हण हे माहिती होते. जारूळ, बोंडारा ही त्या झाडाची टोपण नावं आहेत. राज्यपुष्पाचे दर्शन झाले तेव्हा माझे पाय जमिनीवर नव्हतेच माझे! It was very very special moment of my life!
ताम्हणाचे फूल पूर्ण उमलल्यानंतर सहा ते सात सेंटीमीटर व्यासाचे होते. त्या फुलाला झालरीसारखी दुमड असणा-या सहा किंवा सात नाजूक, तलम चुणीदार पाकळ्या असतात.
भारतीय उपखंडातले ते फूल त्याच्या गुणांमुळे युरोप-अमेरिकेतही पोचले आहे. जारूळ, अर्थात ताम्हणाचा वृक्ष भरपूर पाणी मिळणाऱ्या जागी वाढतो. ते झाड मे-जूनच्या दरम्यान फुलून येते. त्याला कोकणात ‘मोठा बोंडारा’ असेही म्हणतात. कोकणात नदी-नाल्यांच्या काठांवर ताम्हणाची भरपूर झाडे दिसतात. बंगाल, आसाम, दक्षिण भारत, अंदमान निकोबार आणि श्रीलंकेतील जंगले येथे ताम्हणाची झाडे आहेत. हा वृक्ष म्यानमार, मलाया, चीन या देशांत नदीकाठी आणि दलदलीच्या भागात मोठ्या प्रमाणावर आढळतो.
ताम्हणाचे झाड सरासरी दहा ते वीस मीटर उंचीचे असते. भारतात त्याचा वापर अधिकतर शोभेसाठी केला जातो. रायगड जिल्ह्यात माणगाव येथे ताम्हणाचा अंदाजे शंभर फुट उंचीचा वृक्ष आहे. ताम्हण रस्त्याच्या कडेला, बागेमध्ये मुद्दाम लावला जातो. त्याचे लाकूड लालसर रंगाचे, मजबूत, टिकाऊ, चमकदार असते. टिकाऊपणा आणि उपयोग याबाबतीत ताम्हण सागवानाच्या झाडाशी स्पर्धा करतो. ताम्हणाचे लाकूड इमारती, होड्या, घरबांधणी, पूल, मोटारी, विहिरींचे बांधकाम, जहाजबांधणी, रेल्वे वॅगनसह विविध वस्तू बनवण्याच्या कामात वापरले जाते.
ताम्हणाच्या वृक्षाचे औषणी गुणधर्मही आहेत. ताप आल्यास या झाडाच्या सालीचा काढा दिला जातो. तोंड आल्यास ताम्हणाचे फळ तोंडाच्या आतून लावले जाते. ताम्हणाच्या पानांत-फळांत ‘हायपोग्लिसेमिक’ हे द्रव्य असते. ते मधुमेहावर गुणकारी आहे. तसेच पोटदुखीवर इलाज आणि वजन कमी करण्यासाठी या झाडाचा उपयोग केला जातो.
ताम्हमणाला राज्यपुष्पाचा दर्जा का दिला, केव्हा दिला? याबाबत नेमकी माहिती सापडत नाही. पण देशातल्या वनस्पतीशास्रातील अभ्यासकांनी ताम्हणाचे ‘प्राईड ऑफ इंडिया’ असे सार्थ नामकरण केले आहे.
– भाऊ चासकर
Apan je kam manpurwak
Apan je kam manpurwak sanshodhak wruttine karat Ahat tya kama sathi Shubheccha
एक नवीन माहीत मिळाली ……
एक नवीन माहित मिळाली… खुप छान वाटलं वाचून. माहिती मिळाली.
Maharashtra’s rajya Phoool
Maharashtra’s rajya Phoool search kartana apli web pahanyat aali. Bondara’s good information. thanks!
खूप उपयुक्त माहिती मिळाली.मी
खूप उपयुक्त माहिती मिळाली. मी माझ्या मुलांसाठी याचा जरूर वापर करीन. कारण माझी शाळा शंभू महादेव डोंगररांगेवर वसलेल्या वारुगड येथे आहे. हा भाग कायम दुष्काळी असल्याने पाण्याची टंचाई नऊ महिने असते. येथेही वेगवेगळे वृक्ष आहेत. त्याची माहिती मी मुलांना देते. पण जे वृक्ष या परिसरात नाहीत, त्याची माहिती मी मिळवून देण्याचा प्रयत्न करते.
अतिशय उपयुक्त माहिती आहे
अतिशय उपयुक्त माहिती आहे. छायाचित्र व माहिती शाळेच्या भिंतीवर काढणार.
सुनिता गावित आणि अभिमन्यू
सुनिता गावित आणि अभिमन्यू कदम, तुम्हा दोघांनाही या माहितीचा उपयोग करता येत आहे, ही आमच्यासाठी समाधानाची बाब आहे. आम्ही या प्रकारची इतरही माहिती तुमच्यापर्यंत पोचवण्याचा जरूर प्रयत्न करू.
खूप छान आणि अभ्यासपूर्वक
खूप छान आणि अभ्यासपूर्वक माहिती मिळाली खूप धन्यवाद ,हे मुलांना सांगायला आणि सोपे पडेल
परीसरात अनेक वनस्पती दिसतात
परीसरात अनेक वनस्पती दिसतात .भटकंतीत नजरेस पडतात ,पण कित्येकदा स्थानिकांनाही झाडांची नावे नीट माहीत नसतात ,या निमित्ताने झाडांचा योग्य परिचय होतोय . धन्यवाद
माहिती खूपच मोलाची आहे.
माहिती खूपच मोलाची आहे. महाराष्ट्राचे राज्यफुल माहित झाले . या माहितीचा खूप उपयोग होईल…..
धन्यवाद..
आम्ही या झाडाचा वृक्षारोपणा…
आम्ही या झाडाचा वृक्षारोपणा सहभाग करू
आज माझे मित्र नि मी झाड…
आज माझे मित्र नि मी झाड बघितले आणि या आगोदर मी कधी बघितले नव्हते आणि माहिती नवती या झाडाला सीड फुलेआलेले बघितले सीड जमा करण्याचा मोह आवरता आला नाही
Mpsc करणाऱ्या आमच्यासारख्या…
Mpsc करणाऱ्या आमच्यासारख्या मुलांसाठी ही खूप महत्वाची माहिती आहे सर, धन्यवाद
ताम्हण: हा राज्यपुष्प आहे हे…
ताम्हण: हा राज्यपुष्प आहे हे वाचनातून महित झाले परंतु कसे आहे? हे माहित नव्हते. फारच सुंदर आहे हे ‘ राज्यपुष्प ‘ धन्यवाद सर
छान माहिती.
साधारण आठेक…
छान माहिती.
साधारण आठेक वर्षांपूर्वी CBSE च्या एका विद्यार्थ्याने फोनवरून ‘महाराष्टाचे राज्यफूल कोणते?’ असा प्रश्न विचारला तेव्हा ओळखीच्या आमदारांकडे चौकशी केली तेव्हा त्यांना काहीच सांगता आले नाही; ‘राज्यफूल’ अशी काही गोष्ट असेल हेही त्याना ठाऊक नव्हते. मग आंतरजालावर ही माहिती मिळाली. जिज्ञासेपोटी झाडाचा शोध सुरू झाला. आणि साधारण चार वर्षांपूर्वी फेब्रुवारी महिन्यात कामशेत आणि लोणावळ्याच्या मध्ये या फुलांनी भरलेल्या झाडांचे दर्शन झाले. सध्या ही झाडे फुलांनी बहरलेली आहेत. वरील लेखात उल्लेखिलेला रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील एस. टी. स्थानकाच्या आधी माणगावमध्ये (मुंबईहून येताना) प्रवेश करताना दिसणारा वृक्षही फुलांनी डवरलेला आहे. कोलाड-रोहा मार्गावर कोलाड पोलीस स्टेशन च्या हद्दीनंतर नवीन लागवड केलेल्या झाडांनाही फुले येऊ लागली आहेत.
I intend to form DEVRAEE in…
I intend to form DEVRAEE in my native place in Konkan area.will you please help me to give guidance as from where
I can get native plants .my contact no. Is 9730611147.
रंजक माहिती राज्य पुष्प…
रंजक माहिती राज्य पुष्प माहीत नव्हते ते माहीत झाले
Comments are closed.