सौदागर शिंदे (Saudagar Shinde)

0
24

सौदागर शिंदे हे मूळचे माढ्याचे. ते माढ्यापासून जवळ असणाऱ्या घाटणे गावातील शाळेचे (सातवीपर्यंत) मुख्याध्यापक आहेत. त्यांनी कोल्हापूर विद्यापीठातून एम.ए. केले आहे. यशवंतराव चव्हाण विद्यापीठातून बी.एड. केले आहे.

त्यांचे आईवडील हलाखीच्या परिस्थितीत जगले आहेत. इतके की, सौदागर यांचा जन्म होईपर्यंत त्यांची आई गर्भार अवस्थेत शेतात काम करत असे. ती शेतात काम करत असतानाच सौदागर यांचा जन्म झाला!

सौदागर शिंदे आयुष्यभरातील अनुभवांवर आधारित कविता करू लागले. त्या कविता स्वातंत्र्यानंतरच्या परिस्थितीत काय कमावले, काय गमावले यावर आधारित आहेत. त्यांचा ‘चैताच्या झळा’ हा पहिला कवितासंग्रह 2000 साली पुणे येथील भरत नाट्य मंदिरात जगदीश खेबुडकर यांच्या हस्ते प्रकाशित झाला. त्यांचा ‘आगडोंब’ हा दुसरा कवितासंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे.

सौदागर शिंदे शाळेच्या बाबतीतही नवनवीन कल्पना राबवत असतात. ते शाळेत लेखनस्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेतात. आपली शाळा इतरांना आवडावी यासाठी सौदागर प्रयत्न करतात.

त्यांच्या शाळेत कॉम्प्युटर लॅबही आहे. तेथे पाच कॉम्प्युटर्स आहेत. एल.सी.डी. प्रिंटरही आहे. सौदागर शिंदे यांच्‍या शाळेला स्वच्छ व सुंदर शाळेचे बक्षिसही मिळाले आहे.

सौदागर शिंदे 9922235832

– पद्मा कऱ्हाडे/ संदीप येडेकर

About Post Author