शिंगडगाव

_Shigadgav_1.jpg

शिंगडगाव सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिण सोलापूर तालुक्यात त्या गावापासून बावीस किलोमीटर अंतरावर आहे. शिंगडगाव हे नाव गावात पूर्वी शिंधीची झाडे जास्त प्रमाणात असल्यामुळे रूढ झाले. गावाची लोकसंख्या दोन हजार पाचशे आहे. एकूण घरांची संख्या चारशे अठ्ठावन्न आहे. गावात अनेक मंदिरे आहेत. श्री धुळीमहाकलेश्वर हे ग्रामदैवत आहे. गावात महालिंगेश्वर, भवानीमाता, विठ्ठल, हनुमान, बिरोबा, लक्ष्मी अशी मंदिरे आहेत. गावाची वार्षिक यात्रा हनुमान जयंतीला असते. यात्रेत रथातून मिरवणूक काढली जाते. संध्याकाळच्या वेळी मनोरंजनासाठी नाटक ठेवले जाते. गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. गावात शेतीपूरक जोडव्यवसाय केले जातात. गावाची बोलीभाषा मराठी व कन्नड आहे.

गावामध्ये ग्रामपंचायत आहे. प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा आहे. त्या शाळेत पहिली ते दहावी पर्यंत शिक्षणाची सोय आहे. पुढील शिक्षणासाठी सोलापूरला जावे लागते. गावामध्ये खरीप व रब्बी हंगामानुसार पिके घेतली जातात. पावसाचे प्रमाण कमी आहे. गावात ओढा व तलाव आहेत, पण त्यामध्ये फक्त पावसाळ्यात पाणी असते. दर बुधवारी आठवडी बाजार भरतो. गाव मिरचीसाठी प्रसिध्द आहे.

गावामधील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा गुणवत्तेच्या आणि भौतिक सुविधांच्या बाबतीत सोलापूर जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाची आहे. गावात शिवजयंती आणि गणेशोत्सव उत्साहाने साजरे केले जातात. श्रीराम तरूण मंडळ हे सांस्कृतिक कार्यक्रम आणि विद्यार्थ्यांकरता क्रीडास्पर्धांचे आयोजन करतात. गावात हनुमान सार्वजनिक वाचनालय आहे. प्रत्येक पौर्णिमेला आणि अमावस्येला गावात महाप्रसादाचे आयोजन केले जाते. होटगीला प्रसिद्ध शिर्डी साईबाबा प्रतिमंदिर आहे.  

_Shigadgav_2.jpgमहाराष्ट्र शासनाची बस दिवसातून दोन ते तीन वेळा गावात येते. गावापासून सात किलोमीटर अंतरावर होटगी येथे रेल्वेस्टेशन आहे. गावात डोंगर नाहीत, पण आजूबाजूला हिरवळ आहे. गावाच्या जवळच NTPC हा औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. तेथे गावातील अनेक लोक कामगार म्हणून काम करतात. गावामध्ये अनेक जातिधर्मांचे लोक राहतात. गावच्या आसपास होठगी, हिपले, आचेंगाव, वळसांग, चिंचोळी, औज ही गावे आहेत.

माहिती स्रोत: त्रिवेणी व्हनकांडे – 9765275203.

About Post Author

3 COMMENTS

Comments are closed.