‘आयुष्य वेचिले, कुटुंब पोशिले’ ही जगरहाटी आहे, पण समाजाकडून उपेक्षित अशा, दुर्दैवाने देहविक्रय करणार्या स्त्रिया व मुलांना आधार देणारे विरळा! नागपूरचे रामभाऊ इंगोले यांचे कार्य या दुर्लक्षित क्षेत्रात आहे.
रामभाऊ इंगोले यांचे वडील स्वातंत्र्यसैनिक होते, त्यामुळे रामभाऊंना लहानपणापासून समाजसेवेचे जणू बाळकडू मिळाले. त्यांच्या कार्याची सुरुवात नागपूरमधील वेश्यावस्ती हटवण्यासाठी कटिबद्ध असलेल्या षड्यंत्राविरुद्ध लढा देण्यापासून, १९८० मध्ये झाली. रामभाऊंवर अनेक वेळा गुंडांकडून हल्ले झाले, तरीही ते त्या आंदोलनात डगमगले नाहीत. वेश्या या समाजाच्या घटक असूनही त्यांना त्यांचे हक्क नाकारले जातात. वारांगनांच्या व त्यांच्या मुलांच्या उन्नतीसाठी त्यांनी १९९२ साली ‘विमलाश्रम घरकुला’ची स्थापना केली. तेव्हापासून ती संस्था उपेक्षित व वंचित मुलांचे पुनर्वसन करत आहे. त्यांना समाजात सन्मानाने जगता यावे म्हणून स्वावलंबी बनवत आहे. संस्थेच्या विद्यमाने ‘पाचगाव’ येथे ‘नवीन देसाई निवासी’ विद्यासंकुल उभे राहिले आहे. वीस मुलांपासून सुरू झालेल्या या शाळेत दोनशे विद्यार्थी आहेत.
शेतकर्यांचे नैराश्य व दारिद्रय दूर करण्यासाठी, त्यांनी शेतकर्यांच्या मुलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. त्याचबरोबर खाणीत काम करणार्या मजुरांच्या मुलांसाठी त्यांनी ‘देसाई फन स्कूल’ सुरू केले आहे. त्याची पुनर्वसनाची चळवळ नागपूर जिल्ह्यापुरती मर्यादित न राहता अमरावती , अकोला , सुरत या ठिकाणीही पसरली आहे. त्यांनी मानवी हक्कांसाठी लढताना वेगवेगळ्या चळवळींमध्ये सहा वेळा तुरुंगवास भोगला आहे.
१. रोटरी क्लब ऑफ नागपूर, ऑरेंज सिटी पुरस्कार
२. रोटरी क्लब इंटरनॅशनल तर्फे ह्युमॅनिटेरियन सर्विस सेंटेनरी पुरस्कार
३. दीनदयाळ उपाध्याय सेवा पुरस्कार
४. सह्याद्री नवरत्न सेवा पुरस्कार
५. दीपस्तंभ पुरस्कार
अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे. त्यांच्या जीवनावर आधारित ‘आधारवड’, ‘तळपत्या तलवारी’, ‘वारांगनांच्या मुलांचा आभाळाएवढा बाप’ अशी पुस्तकेही प्रसिद्ध केली गेली आहेत. ‘गोल्डन आय ग्रूप’ने त्यांच्या कार्यावर आधारित सिनेमा केला आहे, त्याचे दिग्दर्शन अरुण नलावडे यांनी केले आहे.
रामभाऊइंगोले
भ्रमणध्वनी: 9860990514
vimlashram@yahoo.co.in
{jcomments on}
Nice work
Nice work
अस काम करायला हिंमत लागते
अस काम करायला हिंमत लागते समाजाविरुध्द जाण्याची, असं तळातल्या, जणुकाही वाळीतच टाकलेल्या लोकांसाठी एवढं करणं कित्ती कठीण! मनःपूर्वक सलाम!
Rambhaunchya abhalaevhdhya
Rambhaunchya abhalaevhdhya karayla Salam.
Comments are closed.