नवी वादचर्चा

0
83

आजच्‍या जीवनमानात आकाशाचे हरवलेले स्‍थान यावर प्रकाश पेठे यांनी चर्चा सुरू केली. प्रथम त्‍यांचे पुत्र ह्रषीकेश पेठे आणि त्‍यानंतर मंदार दातार यांकडून ही चर्चा पुढे नेण्‍यात आली. निसर्ग आणि मानव यांमधील नात्‍याचा आपल्‍या परिने वेध घेऊ पाहणारी ही वादचर्चा प्रसिद्ध करत आहोत. ‘थिंक महाराष्‍ट्र’वर यापूर्वी ‘देऊळची चर्चा लवासाच्‍या दारी’, ‘कवितेचं नामशेष होत जाणं’ अशा काही उत्‍तम चर्चा प्रसिद्ध करण्‍यात आल्‍या आहेत. समाजाला आलेले बुद्धीमांद्य दूर होण्‍यास अशा चर्चांची मदत व्‍हावी, हा या प्रयत्‍नाचा उद्देश आहे.

     पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांपासून माणसाची निर्मिती झाली असं मानलं जातं. मानवाने आदीम काळात यापैकी पहिल्‍या चार तत्‍त्‍वांची भीती बाळगून त्‍यांपासून बचाव करण्‍यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्‍या. मात्र त्‍याच्‍यालेखी आकाश निरूपद्रवी राहिलं ते आजपर्यंत. आज सगळ्या सणांचा इव्‍हेन्‍ट झालेला असतानाही आकाश मात्र दुर्लक्षीत राहिलं. पूर्वीच्‍या काळी वास्‍तूरचनेपासून कल्‍पनांपर्यंत असलेलं आकाशाचं prakash_pethe_1स्‍थान आणि निसर्गनिरीक्षण आज विरळ झाल्‍याचं दिसतं. प्रकाश पेठे यांनी ‘तिंतल तिंतल लितिल ताल’ या लेखातून हा विचार मांडत मानवाच्‍या आकाशाकडे झालेल्‍या दुर्लक्षाकडे लक्ष वेधण्‍याचा प्रयत्‍न केला. यानंतर या लेखावर प्रकाश पेठे यांचे पुत्र ह्रषिकेश पेठे यांच्‍याकडून काही मुद्दे उपस्थित करण्‍यात आले. मानवाच्‍या जीवनशैलीत असलेली आकाशाची कमतरता ही त्‍याच्‍या कल्‍पनाशक्‍तीला तिलांजली असल्‍याच्‍या मुद्द्यावर ह्रषिकेश यांनी फारकत घेत आपले म्‍हणणे मांडले. या मुद्द्यांवर पुन्‍हा आपली मते मांडत प्रकाश पेठे यांनी ही चर्चा पुढे नेली.

mandar_1     पिता-पुत्रांची ही चर्चा सुरू असतानाच मंदार दातार यांनी वैदिक संस्‍कृतीत पंचमहाभूतांचा आणि विशेष करून आकाश तत्‍त्‍वाचा विविध स्‍तरांवर केला गेलेला विचार स्‍पष्‍ट करणारे लेखन ‘आकाशाचे नाते’ या शिर्षकाखाली केले. त्‍यामध्‍ये आर्यांची जीवनपद्धती, यज्ञयाग यांमधील आकाशाचे स्‍थान विषद करत आजच्‍या काळात निसर्गनिरीक्षण करण्‍याची गरज कमी कशी झाली याचेही उत्‍तर मांडण्‍याचा प्रयत्‍न केला आहे.

     आजच्‍या जीवनमानात आकाशाच्‍या हरवलेल्‍या स्‍थानापासून सुरू झालेली ही चर्चा निसर्ग आणि मानवापर्यंत येऊन पोहोचली. पेठे पितापुत्र आणि दातार यांनी लिहीलेले हे लेख वादचर्चा या विभागात सादर करत आहोत. ‘थिंक महाराष्‍ट्र’वर यापूर्वी ‘देऊळ’ची चर्चा लवासाच्या दारी , कवितेचं नामशेष होत जाणं…, अशा काही वादचर्चा प्रसिद्ध करण्‍यात आल्‍या आहेत. समाजाला आलेले बुद्धिमांद्य दूर होण्‍यास याप्रकारच्‍या चर्चांची मदत व्‍हावी, असा या प्रयत्‍नाचा उद्देश आहे.

–     संपादक

{jcomments on}

About Post Author

Previous articleतिंतल तिंतल लितिल ताल !
Next articleसमांतर संवेदना
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.