– अशोक दातार /शेखर साठे
भरत गोठोसकर यांनी लोकसत्तेत ‘गुगलला मराठीचे वावडे का’ हा लेख लिहीला. त्यातील काही विचार पटल्यानंतरही अशोक दातार यांच्या मनात काही शंका उपस्थित राहिल्या. त्यांच्या या शंकांवर शेखर साठे यांच्याकडून भाष्य करण्यात आले. या दोघांनी गोठेसकर यांच्या लेखावर केलेली ही मल्लिनाथी…
– अशोक दातार /शेखर साठे
‘गुगल’ला मराठीचे वावडे का? हा भरत गोठोसकर यांचा ‘लोकसत्ते’मधील लेख उत्तम व विचारप्रवर्तक वाटला. त्यातील प्रतिपादनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. पण मला एक साधा प्रश्न पडतो. त्याचे उत्तर आपले आपण द्यायचे आहे. आपण एवढे मराठीप्रेमी, परंतु सर्वांना सहज वापरता येईल आणि एकमेकाशी तसाच संपर्क साधता येईल असा सर्वसामायिक मराठी फाँट का निर्माण करू शकत नाही? माझ्या या ‘आपण’मध्ये मुख्यमंत्री, बाळ ठाकरे, त्यांचा मुलगा उध्दव, पुतण्या राज, आणि बाकी सर्व-प्राध्यापक, लेखक, वकील, प्रशासक येतात. यांपैकी कोणालाही आच कशी वाटत नाही? हा सर्वसामायिक फाँट वर्तमानपत्रे, विद्यापीठे, न्यायालये, सरकारी कचेर्या, शाळा आणि माझ्यासारखे सर्वसामान्य लोक या सार्यांना वापरता येऊ शकेल. त्यामुळे इमेल सहज करता येतील, लेख लिहिता येतील, प्रतिसाद देता येईल… कितीतरी सुविधा! आपल्यापैकी कोणी हे जे साधले नाही, ते ‘गुगल’ने केले आहे. आपण सर्व हा मुद्दा घेऊन पुढे का जात नाही? तो मुद्दा सार्वत्रिक लागू आहे, तातडीचा आहे आणि सक्तीचादेखील होऊ शकतो.
गोठोसकर यांनी या फार महत्त्वाच्या प्रश्नाला तोंड फोडले आहे. त्यातून माहिती तर कळतेच, परंतु काही आकडेवारीदेखील उपलब्ध होते.
मराठी लोक हे इंटरनेटवरील या प्रकारच्या सेवा आणि विविध कृती यांना तेवढे मोठे गिर्हाइक नाही, म्हणून आपली उपेक्षा होते का?
– अशोक दातार – फोन नं. (022) 24449212, भ्रमणध्वनी: 9867665107, इमेल: datar.ashok@gmail.com
हा दोष ‘गुगल’चा नाही. मराठी माणसाची बुध्दीच खुंटली आहे! ज्ञान-विज्ञान, कला, तत्त्वज्ञान, वाड.मय, राजकारण, नेतृत्व, व्यवसाय…. या कोणत्याही क्षेत्रात मराठी माणसाने गेल्या कित्येक काळात काही महत्त्वाची कामगिरीच बजावलेली नाही. गोठोसकर तसा स्पष्ट उल्लेख करत नाहीत, तथापी त्यांच्या लेखामधून तेच उघड होते – काहीसे अनपेक्षितपणे. त्यांनी अंतराळयानावर पाठवल्या गेलेल्या संदेशाचे मराठी भाषांतर दिले आहे. कोणीही ते वाचले तरी त्यातील भाषेचा हिणकस वापर, भाषेतून निर्माण झालेला अनर्थ यांबद्दल फक्त रडावेसे वाटेल! आजच्या आपल्या अवनत सांस्कृतिक अवस्थेचे द्योतक म्हणजे ते भाषांतर! मराठी माणसाकडून यापेक्षा वेगळी कसली अपेक्षा करणार? जगातल्या इतर भाषांत न्यावे या लायकीचे मराठीत काही लिहिले जात आहे का?
– शेखर साठे – इमेल: shekharsathester@gmail.com
{jcomments on}