– संजय भास्कर जोशी
नरहर कुरुंदकरांचा जो प्रश्न गांधीजींच्या आंदोलनाबाबत होता; आणि आजही अनेक तो विचारतात, की आंदोलनाला पाठिंबा देणारी एवढी जनता गाढ़व आहे का? त्याचे उत्तर असे आहे, “होय, जनता गाढ़व असेलही, किंवा तुम्ही तिला मुकी मेंढरे म्हणू शकता, पण मेंढरांना, गाढवांना सन्मानाने, स्वच्छ आणि सुखाने जगू द्यायचा हक्क नाकारण्याचा अधिकार बलिष्ठ सिंहाला किंवा लबाड कोल्ह्याला नाही. बुद्धी, सामर्थ्य आणि शौर्य हे गुण घाउक स्वरूपात वाटले जात नसतात. परेटोचा ८०:२० नियम आठवा. स्वच्छ सुखी जगण्याचा हक्क अस्तित्वानेच मिळावा, गुणसमुच्चयाने नाही. बाकी आंदोलनाचे टायमिंग, मार्ग वगैरे मुद्दे योग्य लोक चर्चेला घेतील, घेतही आहेत. फक्त आंदोलने केवळ बुद्धीवर अन शौर्यावर चालत नसतात इतकेच लक्षात घ्यावे.
– संजय भास्कर जोशी
नरहर कुरुंदकरांचा जो प्रश्न गांधीजींच्या आंदोलनाबाबत होता; आणि आजही अनेक तो विचारतात, की आंदोलनाला पाठिंबा देणारी एवढी जनता गाढ़व आहे का?
त्याचे उत्तर असे आहे, “होय, जनता गाढ़व असेलही, किंवा तुम्ही तिला मुकी मेंढरे म्हणू शकता, पण मेंढरांना, गाढवांना सन्मानाने, स्वच्छ आणि सुखाने जगू द्यायचा हक्क नाकारण्याचा अधिकार बलिष्ठ सिंहाला किंवा लबाड कोल्ह्याला नाही. बुद्धी, सामर्थ्य आणि शौर्य हे गुण घाउक स्वरूपात वाटले जात नसतात. परेटोचा ८०:२० नियम आठवा. स्वच्छ सुखी जगण्याचा हक्क अस्तित्वानेच मिळावा, गुणसमुच्चयाने नाही. बाकी आंदोलनाचे टायमिंग, मार्ग वगैरे मुद्दे योग्य लोक चर्चेला घेतील, घेतही आहेत. फक्त आंदोलने केवळ बुद्धीवर अन शौर्यावर चालत नसतात इतकेच लक्षात घ्यावे.
तूर्तास बाबा आमटे यांचे एक अप्रतिम चिंतन आठवते ते सांगतो –
क्रांती ही सीतेसारखी असते
ती वनवासी रामाची साथ करते
पण तोच मर्यादा पुरुषोत्तम
जेव्हा राज्यारूढ़ होतो
तेव्हा ती पृथ्वीच्या पोटात गड़प होते….
– संजय भास्कर जोशी, भ्रमणध्वनी – 09822003411, इमेल – sanjaybhaskarj@gmail.com
संजय भास्कर जोशी यांची इतर मल्लिनाथी
‘टिंबख्तू’: एक विदारक सत्य!
शिक्षा आणि गुन्हा
बाब अगदीच साधी!
‘लोकराज्य’चा चमत्कार!
{jcomments on}