हे मरण जगताना मला फार पोरके वाटते

0
40
मुंबईत घडलेल्‍या बॉम्‍बस्‍फोटांनंतर सत्ताधीशांनी दिलेल्‍या प्रतिक्रिया वाचून मनात संतापाची भावना प्रचंड निर्माण झाली आहे. मानवी अधिकाराच्‍या नावाखाली सारा बट्ट्याबोळ चालवला आहे. शंभर कोटी लोकसंख्‍या असलेल्‍या या भारत देशात कोणतेही नेतृत्‍व नाही. कंदहारसारख्‍या घटना घडल्‍यानंतर तुमचे सरकार उलथून पडल्‍याशिवाय राहत नाही. बॉम्‍बस्‍फोटाच्‍या घटनेनंतर हेही सरकार कायम राहील याची शाश्‍वती नाही. यानंतर येणारे अ-सरकारही असेच असेल!


– शिरीष गोपाळ देशपांडे

   मुंबईत घडलेल्‍या बॉम्‍बस्‍फोटांनंतर सत्ताधीशांनी दिलेल्‍या प्रतिक्रिया वाचून मनात संतापाची भावना प्रचंड निर्माण झाली आहे. मानवी अधिकाराच्‍या नावाखाली सारा बट्ट्याबोळ चालवला आहे. शंभर कोटी लोकसंख्‍या असलेल्‍या या भारत देशात कोणतेही नेतृत्‍व नाही. कंदहारसारख्‍या घटना घडल्‍यानंतर तुमचे सरकार उलथून पडल्‍याशिवाय राहत नाही. बॉम्‍बस्‍फोटाच्‍या घटनेनंतर हेही सरकार कायम राहील याची शाश्‍वती नाही. यानंतर येणारे अ-सरकारही असेच असेल! जयप्रकाश नारायण यांनी म्‍हटले, ‘नाग गेला आणि साप आला’. हे वाक्‍य येथे तंतोतंत लागू पडते. हे सरकार प्रचंड कुचकामी आणि षंढ आहे. सर्वसामान्‍य माणसाने सिग्‍नल तोडल्‍यावर पोलिस हप्‍ते वसूल करतात आणि अतिरेक्‍यांना फाईव्‍ह स्‍टार ट्रीटमेण्ट दिली जाते.

   आता हे मरण जगताना मला फार पोरके वाटते. पुढील जन्‍मी या देशात जन्‍म घेण्‍यापेक्षा रवांडाच्‍या भूमीवर कुत्रा म्‍हणून जन्‍माला यावे. तेथे अमेरिकेच्‍या सैनिकांच्‍या लाथा खात आनंदाने केकाटत राहू, पण पुढील जन्‍म अशा पागलखान्‍यात नको. अतिरेक्‍यांना नष्‍ट करणाच्‍या कोणत्‍याही कठोर उपाययोजना सरकार करणार नसेल तर हा देश हाकण्‍यास कुणीच लायक नाही असे म्‍हणावे लागेल. संभाव्य पंतप्रधान राहुल गांधी, दिग्विजय सिंग, चिदंबरम, यांच्‍याकडून देण्‍यात आलेल्‍या प्रतिक्रिया ‘असे होतच असते’ अशा स्‍वरूपाच्‍या आहेत. जर तुम्‍हाला जमत नसेल तर तुम्‍ही पदावरून खाली उतरावे!

शिरीष गोपाळ देशपांडे, पदव्युत्तर मराठी विभागप्रमुख, S. N. D. T. विद्यापीठ, भ्रमणध्वनी – 9820236843

{jcomments on}

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here