हस्ता गाव (Hasta)

_HastaGaon_1.jpg

हस्ता गाव हे औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यात वसलेले आहे. कन्नडपासून पंधरा किलोमीटर अंतरावर हस्ता गाव आहे. मुख्य रस्त्यापासून अर्धा किलोमीटर आत डोंगराच्या कुशीत वसलेले आहे. गावात येण्यासाठी कन्नड तालुक्यातून एसटी मिळते. ती हस्ता स्टॉपपर्यंत येते. हस्तास्टॉप हा गावापासून अर्ध्या तासावर आहे. गावाची लोकसंख्या एक हजार नऊशेबावन्न आहे. गावात तीन मंदिरे आहेत आणि एक मस्जिद आहे. त्यात मारूती मंदिर, नरसे महाराज तसेच, गणपती मंदिर यांचा समावेश होतो. गावचे ग्रामदैवत नरसे महाराज आहे. नरसे महाराजांची प्रत्येक वर्षी मे महिन्यात यात्रा असते. यात्रा पाच दिवस असते. त्या पाच दिवसांत सुरूवातीला तमाशा असतो. त्यानंतर सर्व देवांची सोंगे पुढील चार दिवस निघत असतात.

गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. गावातील लोक आधुनिक शेतीकडे वळलेले आहेत. गावातील एक्याण्णव लोक सरकारी नोकरीत आहेत. तसेच, पंधरा लोक लष्करात आणि वीस पोलिसांत आहेत. गावात पंच्याऐंशी शिक्षक आणि पंचवीस शिक्षिका आहेत. गावाच्या चारी बाजूंनी डोंगर आहे. डोंगराला लागून गवताळा अभयारण्य आहे. ते गावापासून दोन किलोमीटरवर आहे. गावाचे हवामान ऋतुमानाप्रमाणे बदलते. अंजना नदीचा उगम गावातून झाला आहे. गावात पाच पाझर तलाव; तसेच, सिमेंट बांध, मातीचे बांध आहेत. गावात पुरातन शेतमारू देवस्थान आहे. डोंगरामध्ये पाण्याच्या कोरीव काम केलेल्या टाक्या आहेत. गाव आंब्यासाठी नावाजलेले आहे. गावात बाजार भरत नाही. बाजार किशोर या गावी मंगळवारी, वासडी या सहा किलोमीटर अंतरावरील गावी गुरूवारी तर, कन्नड तालुक्यात शुक्रवारी भरतो. गावात सातवीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. गावात दहावीपर्यत खाजगी शाळा आहे. विज्ञार्थी पुढील शिक्षणासाठी कन्नड तालुक्याला जातात. गावातील कल्पना नीळ या गोंदिया जिल्ह्याच्या कलेक्टर आहेत. त्या गावाला जानेवारी 2017 मध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील आदर्श गाव म्हणून पुरस्कार प्राप्त झाला. गावाच्या आसपास मेहेगाव, वासडी, निंबोरा, तपोवन, साखरवेल ही गावे आहेत.

माहिती स्रोत – गणेश नीळ – 7350894507, मनोहर नीळ – 9822111105.

– नितेश शिंदे

About Post Author

Exit mobile version