हल्ला संविधानावर !

0
31

– विलास सोनावणे

  जागतिकीकरणाचा फोलपणा अण्‍णांच्‍या घटनेतून सामोरा येतो. जागतिकीकरणामुळे भांडवलदारांचे चारित्र्य बदलले. त्याने भ्रष्‍टाचाराला स्‍कोप दिला. केतकर म्‍हणाल्‍याप्रमाणे अण्‍णांच्‍या या आंदोलनामुळे लोकशाही धोक्‍यात येणार आहे. मात्र या आंदोलनाने भ्रष्‍टाचाराचा मुद्दा निकालातही निघणार नाही. भ्रष्‍टाचार हे भांडवलशाहीचे अभिन्‍न अंग आहे. त्‍याशिवाय धनसंचय होऊ शकणार नाही. भ्रष्‍टाचाराचा मुद्दा प्रथमच निर्माण झालेला नाही. व्‍ही. पी. सिंग वगैरे मंडळींनी हा मुद्दा समोर आणलाच होता. टूजी स्‍कॅम असोत, वा हर्षद मेहता प्रकरण, या सर्व प्रकरणांतूनही हा मुद्दा वारंवार समोर आला आहे. यापूर्वी भ्रष्‍टाचाराच्‍या मुद्द्यावरून सरकारे कोसळली, मात्र त्‍यावेळी कुणी संविधानाला हात घातलेला नव्‍हता.


– विलास सोनावणे

     कुमार केतकर आणि दिनकर गांगल यांनी क्रूर जागतिकीकरणाच्‍या बाजूने ज्‍या भूमिका घेतल्‍या, त्‍या मला नेहमीच खटकत राहिल्‍या. मी आणि केतकर यांनी एकत्रितपणे गिरण्‍यांच्‍या गेटवर गिरणी कामगारांच्‍या सभा घेतलेल्‍या आहेत. अचानक, त्‍यांनी हे सगळे सोडून जागतिकीकरणाच्‍या बाजूची भूमिका घेणे मला बोचणारे ठरले.

     जागतिकीकरणाचा फोलपणा अण्‍णांच्‍या घटनेतून सामोरा येतो. जागतिकीकरणामुळे भांडवलदारांचे चारित्र्य बदलले. त्याने भ्रष्‍टाचाराला स्‍कोप दिला. केतकर म्‍हणाल्‍याप्रमाणे अण्‍णांच्‍या या आंदोलनामुळे लोकशाही धोक्‍यात येणार आहे. मात्र या आंदोलनाने भ्रष्‍टाचाराचा मुद्दा निकालातही निघणार नाही. भ्रष्‍टाचार हे भांडवलशाहीचे अभिन्‍न अंग आहे. त्‍याशिवाय धनसंचय होऊ शकणार नाही. तसेच, भ्रष्‍टाचाराचा मुद्दा प्रथमच निर्माण झालेला नाही. व्‍ही. पी. सिंग वगैरे मंडळींनी हा मुद्दा समोर आणलाच होता. त्‍यातच नुकतेच झालेले टूजी स्‍कॅम असोत, वा हर्षद मेहता प्रकरण, या सर्व प्रकरणांतूनही हा मुद्दा वारंवार समोर आला आहे. यापूर्वी भ्रष्‍टाचाराच्‍या मुद्द्यावरून सरकारे कोसळली, मात्र त्‍यावेळी कुणी संविधानाला हात घातलेला नव्‍हता.

     शेवटी, हा भ्रष्‍टाचार कुठे जाऊन थांबणार? भ्रष्‍टाचार म्‍हणजे केवळ पैसे खाणे नव्‍हे. माणसाला माणसाच्‍या बरोबरीने जगण्‍याचे अधिकार नाकारणे हा सर्वांत मोठा भ्रष्‍टाचार आहे. तुकाराम महाराजांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे धनाची आसक्‍ती हा मोठा भ्रष्‍टाचार आहे. देशातील कष्‍टकरी, कामगार, स्त्रिया, दलित या सर्वांवर होणारे अन्‍याय अण्‍णांना दिसत नाहीत का? या निकषावर अण्‍णांसोबत जी माणसे आहेत त्‍यांच्‍या भूमिका काय आहेत? मी प्रचंड अस्‍वस्‍थ आहे, कारण वरवर गोंडस दिसणारा भ्रष्‍टाचार निर्मूलनाचा हा मुद्दा देशातील तळागाळातील वर्गांच्‍या विरोधात जाणार आहे. कारण या वर्गाच्‍या हाती केवळ एक हत्‍यार उरले आहे आणि ते म्‍हणजे संविधान आणि अण्‍णांचा हल्‍ला संविधानावरच आहे! या संविधानाने न्‍यायव्‍यवस्‍था आणि संसदेत समतोल राखला आहे. अण्णांच्या आंदोलनाचा रोख समतोलाला बायपास करून नवीन असंविधानिक व्‍यवस्‍था निर्माण करण्‍याकडे दिसतो.

     केतकर, गांगलांसारख्‍या आमच्‍या मित्रांनी या परिस्थितीला त्‍यांच्‍या जागतिकीकरणाच्‍या बाजूने घेतलेल्‍या भूमिका जबाबदार होत्‍या, हे प्रांजळपणाने कबूल करावे.

विलास सोनावणे, मुस्लिम ओबीसी चळवळीचे प्रणेते, भ्रमणध्वनी:9422520574,  vilassonawane@hotmail.com

दिनांक : 17-08-2011

{jcomments on}

About Post Author

Previous articleशम्मीकपूरचा संदर्भ
Next articleपर्याय काय?
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.