दैनिक लोकसत्तेत दर गुरूवारी ‘भवताल’ नावाचे एक पान प्रसिद्ध केले जाते. दिनांक 12 मे 2011 च्या या पानावर अभिजीत घोरपडे यांनी ‘असाही एक धाबा’ या मथळ्याखाली फार रोचक माहिती दिलेली आहे. जेजूरी परिसरातील एका गावात असलेल्या ‘माऊली’ नावाच्या एका ढाब्याचे खरकटे पाणी वापरून चव्हाण नावाच्या व्यक्तिने एक एकर शेतीत सिताफळाची बाग फुलवली आहे. शहरांमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुर्नवापर करण्याच्या वारंवार सूचना देवूनही कुणीच काही करत नाही. अशा वेळी या व्यक्तिने केलेले काम खरोखर स्तुत्य वाटते.
स्वप्नाली यादव या जलतरणपटूने ऑस्ट्रेलियातील एका तलावात 20 कि. मी. चे अंतर पार करून पहिला क्रमांक पटकावला. मात्र तिला म्हणावी तशी प्रसिद्धी मिळाली नाही. अशा वेळी लोकसत्ताने स्वप्नाली यादववर व्यक्तिवेध सादर करणे फारच योग्य वाटले.
अशोक जैन
पत्रकार-लेखक
दिनांक – 12.05.2011


