सत्य साईबाबांच्या निधनाचे वृत्त आज सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले. मात्र त्याला अवास्तव महत्त्व देण्यात आले आहे, असे वाटते. वर्तमानपत्रांमध्ये साईबाबांवरील पुस्तकाचे उतारेच्या उतारे देण्यात आले आहेत.
सत्य साईबाबांच्या निधनाचे वृत्त आज सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले. मात्र त्याला अवास्तव महत्त्व देण्यात आले आहे, असे वाटते. वर्तमानपत्रांमध्ये साईबाबांवरील पुस्तकाचे उतारेच्या उतारे देण्यात आले आहेत. सत्य साईबाबा हे वादग्रस्त व्यक्तिमत्व होते. ते चमत्कार करत असे म्हटले जाई. त्यांनी समाजकार्य केले असले तरी त्यांच्याठायी भोंदूपणा होता, हे नाकारणे शक्य नाही. त्यांमुळे हे वृत्त थोडक्यात प्रसिद्ध करणे योग्य ठरले असते.
काही पत्रकारांसमवेत मी एकदा सत्य साईबाबांना भेटलो होतो, पण मला त्यांच्या पाया पडावेसे वाटले नाही. त्या वेळी जे त्यांच्या पाया पडले, त्यांना सत्य साईबाबांनी हवेतून ‘चमत्कार’ करत अंगठ्या, घड्याळ वगैरे वस्तू काढून दिल्या, मात्र मी चरणस्पर्श न केल्याने त्यांनी माझ्यावर ती ‘कृपादृष्टी’ दाखवली नाही.
अशोक जैन
पत्रकार – लेखक
दिनांक – 25/04/2011
{jcomments on}


