मी ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’च्या कंपाऊंडमध्ये विशिष्ट प्रेरणेने झपाटलेले काही विद्यार्थी १९७२ ते १९७७ च्या काळात पाहिले! त्यातील सतीश नाईक हे एक नाव! तो विशुद्ध कला विभागात शिकत होता. मी त्याच कंपाऊंडमधील उपयोजित कला संस्थेचा विद्यार्थी व नंतर सहअधिव्याख्याता (कार्यशाळा सहाय्यक) म्हणून वावरलो. सतीश नाईक ह्याची व माझी प्रत्यक्ष ओळख चित्रकार दत्तात्रय पाडेकर व विज्ञान उपयोजित चित्रकार मित्र नाना शिवलकर यांच्यामुळे झाली. सतीश रेखा व रंगकला ह्या भागाचा विद्यार्थी होता. संभाजी कदम त्याच्या शिक्षक वर्गात होते.
सतीशचा जन्म ५ एप्रिल १९५५ चा. त्याने जे.जे स्कूल ऑफ आर्टमधून फाइन आर्ट्स व इंटेरियर डिझाइनचा अभ्यास पूर्ण केला व पदविका मिळवली.
त्याची चित्रकारिता वैशिष्ट्यपूर्ण होती. मला तीमध्ये ‘बाहाऊस’ कलाशिक्षणाचे एक सृजनशील प्रसिद्ध चित्रकार पॉल क्ली यांचा प्रभाव जाणवत असे. सतीशने अमूर्त चित्रकला विचारपूर्वक अभ्यासत असताना स्वत:ची स्वतंत्र शैली विकसित केली. मी त्याचे चित्र ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्ट’ ह्या मुंबईतील कलादालनाच्या संग्रहात पाहिलेले आहे. सतीश पुढे चित्रे नियमित काढत राहिला नाही. परंतु योगायोग असा, की त्याला गेली पंधरा-वीस वर्षे पॉल क्लीच्याच दृक् प्रभावातील भारतीय चित्रकार वासुदेव गायतोंडे यांच्या चित्रकलेने झपाटले आहे! त्याने २००७ साली गायतोंडे यांच्यावरील ‘चिन्ह’चा खास अंक प्रकाशित करून दृश्यकलेच्या अभ्यासकांसाठी खूप महत्त्वाचे काम करून ठेवले आहे व एक प्रकारे, त्यांच्या प्रती स्वत:ची कृतज्ञताही व्यक्त केली आहे.
सतीश चित्रकारिता सोडून पत्रकारितेकडे का वळला ह्याचे उत्तर त्याने आमच्या एका गप्पांत सांगितले. त्याला विद्यार्थिदशेपासून अभ्यासू विद्यार्थ्याला पडत असलेल्या प्रश्नांनी अस्वस्थ केले होते. शिक्षक चांगले मिळूनदेखील चित्रकलेसंबंधात समाधान करणारी उत्तरे मिळत नव्हती. लिहिण्याची व वाचनाची आवड होतीच. आजुबाजूच्या जाणकारांकडून व्यवस्थित माहिती मिळत नसे.
त्याला पत्रकारिता हे माध्यम दोन कारणांकरता जवळ करावेसे वाटले.
एक : चित्रकलेच्या शिक्षणानंतर मध्यमवर्गातील त्याच्यासारख्यांना त्यावर जगणे कठीण! आणि कलात्मक मूल्यांकरता तडजोड अमान्य! परंतु चित्रकलेचे शिक्षण आयुष्यात स्वत:ला व इतरांना उपयोगी व्हावे ही इच्छा.
दोन : पत्रकार होण्यामुळे व्यवसायाचा एक भाग म्हणून प्रत्यक्ष चित्रकारांना भेटण्याची संधी व त्यांचे लेख आणि छायाचित्र रूपाने दस्तऐवजीकरण हे सोपे.
नोकरीमुळे महिन्याची आर्थिक विवंचना दूर. त्याकरता त्याने पत्रकार होण्याचा मार्ग पत्करला. त्याने ‘लोकप्रभे’त उपसंपादक, प्रमुख उपसंपादक, ‘चित्ररंग’मध्ये उपसंपादक, ‘वेध’चा संपादक अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्याने कलाकिर्द नावाची कलाकारसूचीदेखील संपादित केली आहे. त्याचे वृत्तपत्रांतील विविध विषयांवरील परखड लेखन काही वेळा वादळी ठरले आहे.
‘लोकप्रभा’ साप्ताहिकाच्या संपादकीय विभागातील नोकरीत जवळ जवळ दोन दशके स्थिर जीवन जगत असतानाच त्याच्या मनात ‘चिन्ह’चे बीज रुजले. पत्नी नीता नाईक हीदेखील चित्रकला क्षेत्रांतील, त्यामुळे ‘चिन्ह’चे बाळ वाढू लागले. त्यांनी नोकरीचे वेळापत्रक सांभाळून वर्षातून एक अंक प्रकाशित करायचा असे आयोजन आखले. खेरीज, नोकरीच्या आर्थिक गणितातून स्वत:च्या हिंमतीवर हे जमवायचे असेही धोरण त्याने पाळले.
त्याने स्वत: ‘चिन्ह’च्या अंकातून चित्रकलेवर लिखाण कमी केले असले तरी ती कमतरता त्याच्या संपादकीयांतून भरून काढली. त्याचबरोबर नवनवीन लेखक शोधत त्याच्या मनातील मूळ प्रश्नाची तड लावत राहिला. सतीश चित्रकला विषयक लेखन-संपादन क्षेत्रात नवा इतिहास लिहिणार अशी जाणीव १९८७ च्या ‘चिन्ह’ अंकाच्या निमित्ताने झाली. तो ‘चिन्ह’चा पहिला अंक – त्यानंतर काही काळ ‘चिन्ह’ प्रकाशित झाले व ते स्थगित झाले. कालांतराने, ‘चिन्ह’ पुन्हा प्रकाशित झालेले दिसले ते नव्या परिपक्व दृष्टीने. सतीशचा कलेचा वारसा जतन करण्याचा कलही वाढलेला जाणवला. त्याकरता तो काही वेळा आक्रमक मोहिमा आखू लागला. मला ‘चिन्ह’चा प्रत्येक अंक येण्याची उत्सुकता वाटू लागली.
त्या अंकातील ‘आणि मी’ नावाचे कल्पक सदर पंचवीस वर्षांनी वाचतानादेखील ताजे वाटते. त्या सदरातून भेटणाऱ्या प्रिया तेंडुलकर, चित्रकार बाबुराव सडवेलकर, ‘आवाज खिडकी’चे कर्ते व्यंगचित्रकार चंद्रशेखर पत्की हयात नसून त्यांना पुन्हा भेटल्याचा आनंद ते वाचताना होतो. अशा अनेक दिग्गजांचे त्यांच्या ‘घडणी’तील टप्पे टिपणारे ते सदर मोठा संचिताचा भाग ठरतो. ‘महाराष्ट्राच्या कळा’ हा अशोक शहाणेचा लेख महाराष्ट्र राज्याच्या चित्रवारशाच्या अवस्थेवर झणझणीत विचाराचा प्रकाश टाकणारा आहे.
अंकांतील लेखकांच्या नावाचा आढावा घेताना चित्रकार दत्तात्रय पाडेकर, सुहास बहुळकर, सुधीर पटवर्धन, पद्माकर कुलकर्णी, सतीश काळदाते, माणिक वालावलकर, नीलिमा कढे, शर्मिला फडके, सुधाकर यादव, वासुदेव कामत, मनिषा पाटील, दिलीप रानडे, महेंद्र दामले, शुभदा पटवर्धन, कमलेश देवरुखकर, शिरीष मिठबावकर, आशुतोष आपटे अशी मोठी यादीच सादर करावी लागेल. चित्रकार चित्रकलेची परिभाषा विकसित होत आहे. ‘चिन्ह’चा प्रवास १९८७, ८८, ८९ ते २००१ ते२०१३ असा जर अभ्यासला तर ह्या प्रयोग चळवळीतून मराठी विचारविश्व दृश्यकलेच्या संदर्भात समृद्ध झाले आहे हे ध्यानात येईल.
सतीशने त्याच्या अंकांतून (‘अक्षरशत्रू’ हा त्याचा चित्रकारांच्या बाबतीतील आवडता शब्द) अनेकांना लिहिते केले आणि अंकांचे विषय समर्पक व मूलभूत प्रश्नांना वस्तुनिष्ठपणे सामोरे जाणारे असेच निवडले.
सतीश नाईकचा ‘मुलाखती व शब्दांकनाचा आकृतिबंध’ महत्त्वाचा ठरला. त्यामुळे फालतू अपसमज परस्पर दूर होत थेट चित्रकारांच्या मनाचा शोध घेता येतो. सुरुवातीचे तीन अंक अशा अनेक नवीन व पूर्वी अनुत्तरित प्रश्नांना घेऊन प्रकाशित झाले. नीलिमा कढे व केशव कासार ह्यांनी घेतलेली (चिन्ह २००३) चित्रकार माधव सातवळेकर यांची मुलाखत तर माझ्याकरता खूप महत्त्वाची ठरली. मला त्यांचा १९७२ ते १९७५ असा कलासंचालक म्हणून सहवास लाभला होता. महाराष्ट्र राज्य कला शिक्षणाचा आकृतिबंध त्याच्या काळात बदलला. मी त्या काही शिबिरांत सहभागी झालो होतो. त्याच वेळी मला दृश्यकला मूलभूत शिक्षणक्रम राबवण्याची संधी मिळाली. त्यामुळे त्यांच्या मुलाखतीतून तो काळ व अनेक प्रश्न पुन्हा नव्याने तपासता आले. ‘चिन्ह’चा वेगवेगळ्या अंकांतून असा अनुभव येत गेला. काहींची उत्तरे मिळाली तर काहींची नाही.
त्याची एकट्याची चित्रप्रदर्शने जहांगीरमध्ये दोन झाली – १९८७ साली व १९९७ साली – मात्र त्याने संयुक्तरीत्या अथवा गटागटांतून चित्रे अनेक वेळा व अनेक ठिकाणी प्रदर्शित केली व त्यामुळे त्याची चित्रे अनेक मान्यवर चित्रसंग्रहांमध्ये पोचली आहेत. त्याने माळशेज घाट, जव्हार, मुरुड जंजिरा, हरिहरेश्वर अशा ठिकाणी ललित कला अॅकॅडमी व आर्टिस्ट्स सेंटर यांच्या वतीने कला कार्यशाळा घेतल्या आहेत. त्याला लेखन व चित्रकारिता या दोन्ही क्षेत्रात प्रतिष्ठेचे पुरस्कार लाभले आहेत.
सतीशने पहिल्या अंकातच ‘चिन्ह’ प्रकाशनाची भूमिका मांडली. ती म्हणजे दृश्यकला केंद्रस्थानी असून तिचा वेध घेणे व तिचे मूल्य रसिकांसमोर साकारणे आणि ते अंकाच्या पानापानांतून प्रकट व्हावे असे प्रयत्न करणे. त्या वचनाला सतीश जागला आहे.
सतीशला कलाप्रसारक किंवा कलाप्रचारक म्हणणे मला पटत नाही, त्याचे कारण ‘चिन्ह’च्या निमित्ताने मोठे व्यासपीठ निर्माण करत असताना त्याचे स्वत:चे विचार, त्याची भूमिका स्पष्ट असतात. तो १९८७ च्या पहिल्या अंकातच म्हणतो… ‘आणि मी’मध्ये ‘चिन्ह’चा हेतू स्वच्छ व मूल्यगर्भ आहे. दृश्यकला केंद्रस्थानी ठेवून तिचा वेध घेणे व तिचे मूल्य रसिकांसमोर साकारणे या दृश्यकला विशेषांकातून पानापानांतून यावे ह्या हेतूची जाणीव असल्याचे आढळून यावे…
चित्रकला दृक्-साक्षरता इंटरनेटसारख्या माध्यमांमुळे व टी.व्ही.चॅनेलांमुळे पसरली आहे. त्याचमुळे लोकांची रंगांची समजही वाढलेली आहे. मी त्याच्या पाचव्या अंकानंतर त्याच्या या प्रकाशनाशी जोडला गेलो ते आजपर्यंत. माझ्याकडील एकूण बारा अंकांचा अभ्यासच डॉक्टरेट मिळवून देण्याच्या योग्यतेचा ठरेल.
सतीश नाईक याच्या विषयनिवडीचा मला कुतूहलयुक्त अचंबा वाटतो. ‘वारली चित्रकला’ देश व परदेशात परिचित करून जीवन त्याकरता समर्पित करणारे कै. भास्कर कुलकर्णी विशेषांक, चित्रकार नागेशकर विशेषांक, चित्रकार वासुदेव गायतोंडे विशेषांक हे संग्राह्य ठरले. काला‘बाजार’ हे लेखन तर महाराष्ट्रातील कलाशिक्षणाचे न घाबरता केलेले डिसेक्शनच आहे. चित्रकला शिक्षणातील अनागोंदी कारभाराची इतक्या धीटपणे व सडेतोड पद्धतीने चिकित्सा करून त्याने मोठेच काम केले आहे. ‘चिन्ह’चा ‘न्यूड’ विषयावरील अंक गाजला, त्या निर्मितीमुळे सतीश काळाच्या एक पाऊल पुढे आहे हे त्याने दाखवून दिले. सतीशने त्यानंतर त्याच्या बद्दलच्या अपेक्षा सतत वाढवत नेल्या आहेत.
सतीश नाईकची ताकद पाचव्या अंकानंतर प्रखरपणे प्रकट झाली. मी तेव्हापासून प्रत्येक अंकाचा प्रकाशन सोहळा चुकवला नाही. माझ्या संग्रही ‘चिन्ह’चे सर्व बारा अंक आहेत. ते मी कलासंचित म्हणून जपून ठेवले आहेत.
मला माझ्या कलाप्रवासात मराठी जगातील मुकुंद गोखले, चंद्रकांत चन्ने आणि सतीश नाईक हे तीन वेगळे कलावंत भेटले. मी त्यांचे वर्गीकरण सृजनशील ‘उद्योजक’ म्हणून करीन. त्यांची स्वत:ची चित्रकला पारंपरिक अर्थाने प्रकट झाली नाही. पण मी त्यांचे संस्थात्मक काम प्रत्यक्ष अनुभवले. मुकुंद गोखले यांनी ‘अक्षररचना संकल्पन’, चंद्रकांत चन्ने यांनी ‘बासोली ग्रूप बाल चित्रकला चळवळ’ आणि सतीश नाईक याने ‘चिन्ह’ असे उपक्रम केले. त्यांनी उद्योग-व्यवसायसम या संस्थाच उभ्या केल्या; पण त्यात सृजनात्मक प्रयोगशीलता आहे आणि यशही आहे. गंमत म्हणजे ह्या कुणाच्याच मालकीची संस्था-इमारत नाही. त्यांच्यात पारदर्शकता, सामाजिक बांधिलकी व विचार प्रसारण हा सच्चेपणा आहे; ‘व्हिजन’ आणि ‘मिशन’ आहे. म्हणून तो व्यवहार असून व्यवहार नाही. तिघेजण त्याच कामात सातत्याने पंचवीस वर्षे ते चाळीस वर्षे व्यस्त आहेत.
सतीशने शिक्षणानंतर पूर्णवेळ चित्रकार होण्याच्या उमेदीच्या काळातील पहिली जवळ जवळ वीस वर्षे ‘चिन्ह’ नियतकालिकाच्या उभारणीत घालवली. ‘चिन्ह’चा ध्यास, त्यातून उद्भवलेले आर्थिक, सामाजिक प्रश्न आणि काही व्यक्तींशी विसंवाद वगैरे संकटे व प्रश्न सोडवत त्याने इतकी वर्षे नेटाने ते काम चालवले आहे. असे काम झपाटलेपणानेच होऊ शकते. झपाटलेपण हे वेडेपणच असते. सडेतोड टीका, काही वेळेस अस्पष्ट, अव्यावहारिक वृत्ती ह्यामुळे नाईक ह्याचे कौटुंबिक जीवन सतत नव्या प्रश्नांना सामोरे जात राहिले आहे. त्यामुळे एरवी तो कलाक्षेत्रातील लोकांना अडचणीचा वाटतो, पण सतीश नाईकला टाळतादेखील येत नाही! इंग्रजीत ‘लव्ह अॅण्ड हेट’ म्हणजे ‘आवडतो परंतु दुरूनच बरा’असे एका नातेसंबंधाचे वर्णन आहे. ती अनेकांची भूमिका सतीशच्या बाबतीत झाली आहे. ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर कोलते यांच्यासारखे चित्रकार मात्र त्याच्या त्या ध्यासाला समंजसपणे प्रोत्साहन देतात. मला ही चित्रकार प्रभाकर कोलते यांची समंजस भूमिका त्याच्याकरता योग्य वाटते.
सतीश नाईक ही व्यक्ती तिच्या ध्यासाशी प्रामाणिक आहे. सतीश नाईकचे ‘चिन्ह’ पंचवीस वर्षे पूर्ण करत असताना त्याची नोंद जगभर घेतली जात आहे. आधुनिक महाराष्ट्राचे हे कलासंचित कदाचित पुढील नव्या कलाशिक्षणाची नांदी ठरू शकेल.
सतीश नाईक
आरएच ८, पुराणिक व्हिला,
कैशेळी, जुना मुंबई आग्रा रोड, जिल्हा ठाणे
९९८७७१४४८८
sateesh.naik55@gmail.com
chinhamag@gmail.com
www.chinha.in
रंजन रघुवीर जोशी
१०२/ ए, विकास पाल्मस्,
c/o आदित्य जोशी, पहिला मजला,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, ठाणे (पश्चिम) ४००६०१
९९२२०१२५११२ (०२२) २५४१२९६८
joranjan@yahoo.co.in
Last Updated On – 17th Nov 2016
apratim udbodhak lekh !
apratim udbodhak lekh !
Strugal of satish naik
Strugal of satish naik
Khupch sundar… Navin
Khupch sundar… Navin Kalakarana “Kala aani Kalesathi Jagana ” yacha arth samjun sangnara lekh..
Khup sundar
Aapalya vishayashi Satish
Aapalya vishayashi Satish nehameech pramanik aahe. Mi tyana tyanchya ghari ekada 2009 saali bhetalo aahe.
उत्तम कार्य …..!
उत्तम कार्य …..!
super ……..
super ……..
Congratulations Satish….. I
Congratulations Satish….. I am very happy to be reading and learning from your publications…. My best wishes for your future journey……
Apratim lekh ! My best
Apratim lekh ! My best wishes for you always………….
Looking forward to the
Looking forward to the release of his book on Gaitonde next month. Best wishes.
मी जे जे सोडले त्यावेळी सतीश
मी जे जे सोडले त्यावेळी सतीश हा अन्तिम वर्षाला होता. एक वेगळेपण जपणारा विद्यार्थी म्हणुनच आवडला. Though always with contraversy…. it was always for the sake of art. Keep up satish.
kharch khup chan..,pn atta
kharch khup chan..,pn atta sadhya painting hya shetratil nvodit kalakaranna rojgar milel as kam karaychi garj ahe..sarkari abhas kramat badl karaychi garj ahe.. maharashtratlya art schoolmadhe jastit juast campus interview hotil ashi thos paval namankit kalakarani uchalali pahije …. ….. … . .pn hya baddal koni kay kart nahi …….. hya baddal khant ahe…
art world required people
art world required people like Satish….I m following CHINHA since last 6 years
Khul chann mala asha lekhatun
Khul chann mala asha lekhatun prerna (kutlehi kam ) kalakarachi mahite milte
झपाटलेलीं माणसंच चिरंतन
झपाटलेलीं माणसंच चिरंतन मुल्ल्यांचे कार्य करूं शकतात. अंतकरणपूर्वक शुभेच्छा.
Nice to know so much about my
Nice to know so much about my esteemed neighbour 🙂
I was Satish’s junior and
I was Satish’s junior and have known him since 1977. I have been reading or getting to know through someone or d other about Satish since he started his career. It indeed is lovely to read this write up… and then.. suddenly I also see at the end..its my Guru Prof Ranjan Joshi…whose name appeared… mast vaatle vaachun :))
Great Journey !!
Great Journey !!
मी चिन्हचे काही अंक पाहीले
मी चिन्हचे काही अंक पाहीले आहेत।
विशेषतः न्युड विषयावरचा अंक
संशोधित व संपादित मजकूर ही चिन्हची जमेची बाजू आहे
चिन्ह करिता मी सतीश सोबत काम
मी सतीश सोबत ‘चिन्ह’ करता काम केले अाहे. मी स्वत: सतीशचं झपाटलेपण अनेकदा अनुभवलं अाहे. एक मैलाचा दगड ठरावा असे मोठे काम सतीशने केले अाहे. त्याला खूप खूप शुभेच्छा!
mee Chinha che don ank
mee Chinha che don ank wachale aahet. Aprateem ! Nude warcha ank jast aawdla. Abhinandan aani shubhechha.
मुकुंद गोखले, संतोष आवटी,
मुकुंद गोखले, संतोष आवटी, मेघा जोशी, ए ए दाढीवाले, नितीन बिल्डीकर, गणेश अपराज, शिरीष देशपांडे, संजय वानखेडे, शेखर साठे, चंद्रकांत चन्ने, आशुतोष, महेश आंजर्लेकर, हर्षद महामुनी, शांताराम वरदे वालावालीकार, कौस्तुभ कुलकर्णी, गीता कॅस्टेलीनो, गौरव काईंगडे, डॉ. शंकर बोऱ्हाडे, आणि प्रकाश दुधळकर या साऱ्याच मित्र मंडळी तसेच चिन्हच्या चाहत्या वाचकांचे अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार ! ‘गायतोंडे’ ग्रंथाच्या निर्मितीत आकंठ बुडालो होतो त्यामुळे तुमच्या आलेल्या प्रतिक्रिया काहीशा उशिराच नजरेला पडल्या, त्यामुळे हा उशीर. पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार !
Namskar,
Namskar,
Barech vela tumchyashi bolave ase vatat hote. Lokprabha sodlyanantar tumchi bhet hou shakali nahi. pan “gaytondenchya shodhat” v aata सतीश नाईक नावाचा झपाटलेला vachlyamule tumchyashi bolalyasarkhe vatale. ya lekhane tumchyatil ek kopra samjnyas madat zali. tumchya karyala shubhecha…….
Struggle aso ti aasi.
Struggle aso ti aashi.
अफलातून लेख असला तरी सतीश
अफलातून लेख असला तरी सतीश नाईक कुठेतरी कमी पडलेले दिसतात. त्यामूळे ते लवकर हरवले असे म्हणता येईल.
Thank you very much Ranjan ji
Thank you very much Ranjan ji for this informative artical about Satishji. we are now waiting for the ‘Gayatonde Granth’ like anything. Satishji always keep posting the updates of the publication of this Book. We have prepared ourselves to be a witness of the grand ceremony of publication of “Gayatonde Granth”
Thanks
congratulations. ..
congratulations. ..
सतीश नाईक हे अप्रतिम चित्रकार
सतीश नाईक हे अप्रतिम चित्रकार आणि उत्तम संपादक आहेत. त्यांच्या कलेविषयीच्या प्रेमाबद्दल आदर आहे. लवकरच गायतोंडे विशेषांक प्रकाशित होईल याची खात्री आहे.
अप्रतिम लेख.
अप्रतिम लेख.
Marathi kala sanskruti la je
Marathi kala sanskruti la je poshak Vatavaran, pravah, hava hota to aaplya ya sundar surekh prayantnatun sakarla aahe. Khup chan. Porki zhaleli maharastra kala chalval Vayat yetey. He ek vyaspith aahe. Abhar.
Maharastra kala sanskritila
Maharastra kala sanskritila ek shaksham vaspith dilya baddal Abhar. Navya pidhila kala sankritacha Adarsh milel v 100 varshacha muka etihas bolka hoil.
Hats off Mr. Satish Naik
Hats off Mr. Satish Naik. Sorry for harsh letter. Eagerly awaiting Gaitonde book. Prof. Dr. Bale V
S. Umanath Sadan. Osmanabad 413501
प्रभावि शब्दरचना , विषेश
प्रभावी शब्दरचना, विषेश लोकांची योग्य दखल घेता आहात. अभिनंदन!
Khup kahi shikvanre ,…
Khup kahi shikvanre , prerana denare ……..
Comments are closed.