शिक्षा आणि गुन्हा

0
41

संजय भास्कर जोशी

     नीरजच्या खुनानंतर पुरावे नष्ट करण्याबद्दल मारियाला ज्या क्षणी दोषी ठरवले त्याच क्षणी तिची तुरुंगातून मुक्तता झाली. जी तीन वर्षे ती दोषी आहे की नाही ते ठरले नव्हते तेव्हा ती तुरुंगात होती. ती शिक्षा होती का? तेव्हा काही तिला आपण दोषी आहोत म्हणून आपण शिक्षा भोगत आहोत असे वाटत नसेल. तिला वाटत असेल, आपण निर्दोष सुटू यातून.

     ती शिक्षा असेल तर प्रश्न असा, की ती निर्दोष नाही असे आढळले असते तर ती शिक्षा का? ती शिक्षा काही परत घेता आली नसती. म्हणजे ती शिक्षा नव्हतीच  ना? मग दोषी व्यक्तीला दोषी ठरल्यावर  शिक्षा का नाही?

     – संजय भास्कर जोशी

     नीरजच्या खुनानंतर पुरावे नष्ट करण्याबद्दल मारियाला ज्या क्षणी दोषी ठरवले त्याच क्षणी तिची तुरुंगातून मुक्तता झाली.

     जी तीन वर्षे ती दोषी आहे की नाही ते ठरले नव्हते तेव्हा ती तुरुंगात होती. ती शिक्षा होती का? तेव्हा काही तिला आपण दोषी आहोत म्हणून आपण शिक्षा भोगत आहोत असे वाटत नसेल. तिला वाटत असेल, आपण निर्दोष सुटू यातून.

     ती शिक्षा असेल तर प्रश्न असा, की ती निर्दोष नाही असे आढळले असते तर ती शिक्षा का? ती शिक्षा काही परत घेता आली नसती. म्हणजे ती शिक्षा नव्हतीच  ना? मग दोषी व्यक्तीला दोषी ठरल्यावर  शिक्षा का नाही?

     कायद्याची  जुजबी माहिती असलेल्याला देखिल माझे प्रश्न नक्कीच वेडगळ वाटतील. पण ज्याच्या हत्येसंदर्भात मारियाला दोषी ठरवले त्या नीरजच्या आई-वडिलांना देखिल कायद्याची जुजबीच माहिती असेल. या संदर्भात विलास सारंग यांची नवी कादंबरी “तन्दुरच्या ठिणग्या” आठवते. त्यात त्यांनी शिक्षा, पाप, गुन्हा याबाबत चिंतन केले आहे.

     या सा-याचा विचार करायला हवा. कनिमोली, राजा, कलमाड़ी यांना दोषी ठरवून तत्क्षणी त्यांची सुटका झाली तर कदाचित सर्वांचे याकडे लक्ष जाईल आणि सर्वत्र आगडोंब पसरेल. देव करो अन् तसे ना होवो, असे देखिल म्हणवत नाही, कारण देव कधीच काही करत नाही अशा बाबतीत. आपणच काय ते करतो, किंवा खरे तर करत नाही.

     – संजय भास्कर जोशी, भ्रमणध्वनी – 09822003411, इमेल – sanjaybhaskarj@gmail.com

About Post Author

Previous article‘वाचू आंनदे’
Next articleधीरोदात्त
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.