वैकुंठवासी

0
75

वैकुंठवासी

हिंदू मृत व्यक्तीविषयी वैकुंठवासी, कैलासवासी असे लिहितात; कारण मृत्यूनंतर व्यक्ती कैलासाला किंवा वैकुंठाला गेली असे मानतात. मुस्लिम, ख्रिश्वन किंवा बौध्द मृतांविषयी पैगंबरवासी, ख्रिस्तवासी किंवा बुध्दवासी असा उल्लेख करतात, तो चूक आहे. कारण पैगंबर, ख्रिस्त किंवा बुद्ध ह्या व्यक्ती आहेत; कैलास-वैकुंठाप्रमाणे स्थाने नाहीत. मुसलमानात जगाचा प्रलय झाल्यावर सर्व आत्म्यांचा निर्णय होईल असे मानले जाते. बौध्द धर्मामध्ये स्वर्ग-नरकाची कल्पना नसून आत्म्यांच्या निर्वाणास महत्त्व आहे. बौध्द धर्म पुनर्जन्मावर विश्वास ठेवत नाही. पण हिंदू धर्माने जेव्हा बुद्धाला विष्णूचा अवतार असल्याचे स्वीकारले तेव्हा गौतम बुद्धाचे पाचशे जन्म मानले गेले व त्यानुसार जातककथा रचल्या गेल्या.

इंग्रजीत ज्याप्रमाणे सर्व मृत व्यक्तींना LATE असे उपपद लावतात, तसे निर्माण करण्याची आवश्यकता आहे. नाहीतर अकारण वाद निर्माण होतील.

सुरेश वाद्ये

About Post Author

Previous articleगिरिमित्र जीवनगौरव सन्मानार्थींना सलाम!
Next articleसाईबाबांमधील संस्कृतिसंकर
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.