वुहान खुले झाल्याचा आनंद (Shanghai resident tells Wuhan Experience)

11
29

अमित आणि अपर्णा वाईकर चीनमध्ये शांघाय येथे गेली दहा वर्षे राहत आहेत. अमित एका मोठ्या कंपनीत सिनियर व्हाइस प्रेसिडेंट आहेत, पण त्याहून त्यांचे महाराष्ट्राच्या-मराठीच्या दृष्टीने वैशिष्ट्य म्हणजे त्या दांपत्यास त्यांच्या मातृभूमीबद्दल असलेली आस्था. अपर्णा विविध मराठी वर्तमानपत्रांत चीनमधील जीवनाबद्दल लिहीत असतात. अमित चीनमधील भारतीयांच्या संघटनेत क्रियाशील असतात, टीव्ही-रेडिओवर मुलाखती देतात. चीनमध्ये पंच्याहत्तरहजार भारतीय आहेत. अमित यांना सन्मान्य प्रवासी भारतीय म्हणून पुरस्कारही मिळाला आहे. मध्यंतरी त्यांची रेडिओवर मुलाखत ऐकून त्यांच्याशी बोलणे झाले होते. चीन कोरोनाला कसे तोंड देत आहे अशी ती मुलाखत होती.

          वुहान कोरोनामुक्त झाला आहे. त्यांचा फोन तेथून बुधवारी सतरा ट्रेन सुटल्या हे आनंदाने सांगण्यास आला होता. ते पुन्हा पुन्हा बजावून सांगत होते, की चीनने या रोगाचा उद्भव झाल्या दिवसापासून त्याच्याविरुद्ध कडक उपाययोजना सुरू केली, महिनाभर लॉकडाऊन केले, वुहानचे तर रस्ते खोदून टाकले, त्यामुळे तेथील जाणे येणे बंद झाले.

         

अपर्णा वाईकर

मी म्हटले, की पण चीनमध्ये रोगाचा पुनरुद्भव होत असल्याच्या बातम्या कळतात. ते म्हणाले, की बरोबर आहे. ते परदेशांतून देशात परतलेले चिनी लोक आहेत. चीनमध्ये कोरोनाआला तेव्हा देशात वर्षारंभ सण होता. तो मोठा महोत्सव असतो, सुट्या असतात. अनेक लोक त्यानिमित्ताने परदेशी गेले; ते तिकडेच अडकले होते. ते आता परतत आहेत. मध्येच अपर्णा म्हणाल्या, सुट्या संपल्यावर शाळा सुरू झाल्या. चीनमध्ये त्या काळात इ-लर्निंगहोते. आमच्या लेकाची शिक्षिका अमेरिकेत सुट्टीला गेली होती. ती तिकडेच अडकली. तर ती तेथून वर्ग घेई, तिचा फोन आमच्या लेकास पहाटे साडेपाच वाजता येई.

          अमित म्हणाले, की चीनचे कारस्थान वगैरे अनेक गोष्टी या रोगाबाबत बोलल्या जातात, पण चीनची स्वतःची कार्यपद्धत गेल्या साठसत्तर वर्षांत निर्माण झाली आहे. ते स्वतःला क्षणात बांधून घेऊ शकतात. दुसऱ्या क्षणी मोकळे सोडू शकतात. वुहानने स्वतःला तसेच आक्रसून घेतले. आता मोकळे सोडले आहे, पण त्याचा अर्थ असा नव्हे, की तेथे सर्व तऱ्हेची मुभा आहे. तेथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होतो. प्रत्येक व्यक्तीची क्यूआर कोडवर सर्व माहिती नोंदलेली असते. ती सतत तपासली जाते. त्यामुळे आजारी माणसाला कोणत्याही ठिकाणी लगेच बाहेर काढले जाते. क्यूआर कोड हिरवा राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असते. काय बिशाद आहे, कोरोना पुन्हा चीनमध्ये येईल! इतका विश्वास अमित यांच्या बोलण्यात जाणवत होता.

          मला अमित यांचे कौतुक यासाठी वाटते, की त्यांना भारत आणि महाराष्ट्र याबाबत जेवढा अभिमान आहे, तेवढाच अभिमान त्यांचे कार्यस्थळ असलेल्या चीनबद्दलही आहे. ते म्हणतात, की भारताने चीनकडून अनेक गोष्टी शिकाव्यात अशा आहेत. वुहान खुले झाले म्हणून जाहीर केल्यावर शनिवार-रविवारी हजारो लोक तेथे उद्याना-उद्यानांत जमले. पण त्यात धोका संभवतो हे जाहीर करताच लोक पांगले. कोरोनाचा धोका पुऱ्या मानवजातीला आहे, कोविड19वर माणसाने मात केली तरी कोविड-20 संभवतो. तो येण्यास नको असेल तर निसर्गाला जाणुया. अमित यांचे पुढील वाक्य मला आवडले. ते म्हणाले, we are the virus, corona is cure.

 

          अमित-अपर्णा अनेक तर्‍हेच्या सामाजिक व सार्वजनिक कार्यात गुंतलेले असतात. ते चीनमध्ये विविध सभासमारंभ घडवतातच, पण ते नागपूर फर्स्ट, गर्जे मराठी अशा तऱ्हेच्या मराठी उपक्रमांमध्येदेखील गुंतले जातात. आमची पहिली ओळख ‘गर्जे मराठी’ या आनंद गानू यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनावेळीच झाली होती. अमित यांच्या विविध कार्यामुळे त्यांच्याकडे बोलण्यासारखे बरेच विषय असतात. त्यांनी वडिलांचा शायरी करण्याचा वारसा स्वतः उचलला नसला, तरी त्यांच्या संभाषणात अनेक शेर येतात व त्यामुळे संभाषण रसपूर्ण होते.
अमित वाईकर +8613918228393
दिनकर गांगल 9867118517 dinkargangal39@gmail.com
(दिनकर गांगल हे थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत.)
——————————————————————————————————————

—————————————————————————————————

About Post Author

Previous articleजुन्या पुस्तकांची अद्भुत दुनिया (Lost World in Old Books)
Next articleसरोज जोशी – फिदा स्वतःवर! (Tribute to Saroj Joshi, Poet)
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.

11 COMMENTS

  1. जीथे आपण रोजीरोटी मिळवितो त्या देशाबद्दल कृतज्ञता हवीच व आपल्या मातृभूमी बद्दल ही प्रेम हवे श्री व सौ.वाईकर यांच्याकडे या दोन्ही गोष्टी आहेत.खूपच छान! सौ.अनुराधा नरेश म्हात्रे.

  2. We are virus..Korona is cure..वा. हा लेख चीन बद्दल जे गैरसमज सामान्य लोकांमध्ये आहेत ते खोडून काढण्यासाठी मदत करेल असे वाटते कारण हा “आँखो देखा हाल “आहे..संध्या जोशी.मुंबई

  3. फारच छान लेख .जन्मभूमी आणि कर्मभूमि दोन्हीबद्दल विशेष आस्था हे फार कौतुकास्पद आहे .लेख वाचून करोनाशी लढायला अजून बळ मिळते.सौअंजली आपटे.

  4. आपण काय करायला हवं हे कळलं.भारतीय लोकशाहीत ते होईल का?इथे तर जनगणना व नागरिकत्व पडताळणीसुद्धा राजकारण्यांनी लटकवलीय.क्यूआर कोड फारच दूरची गोष्ट झाली.चीनच्या कॅरेक्टर/स्वभावात एक निर्घृणपणा जाणवतो.कदाचित शिस्तीच्या नावाखाली तो झाकला जात असावा?

  5. अमित आणि अपर्णा यांना चीनबद्दल सार्थ अभिमान आहे.QR कोड बद्दल नव्याने कळले.Corona प्रकरणाला जबाबदार असणाऱ्या आणि त्यालाही जबाबदार असणाऱ्या त्यांच्या खाण्याच्या सवयींबद्दल कुठेही अपराधीपणाची भावना चीनने एकदाही व्यक्त केली नाही याचे मात्र मला राहून राहून आश्चर्य वाटत आहे कोणी देईल का याचे उत्तर?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here