महाविद्यालयात कमी उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांची योग्य पडताळणी केल्यानंतर त्यांना परिक्षेत बसू देण्याचा निर्णय दिला जाईल, हे महाराष्ट्र टाईम्सच्या दिनांक 6 एप्रिल 2011 च्या अंकात प्रकाशित झालेले साठ्ये कॉलेजच्या प्राचार्य कविता रेगे यांचे विधान हास्यास्पद आहे. विद्यार्थी वर्गात उपस्थित न राहिल्यामुळे त्यांना परिक्षेस बसू न देणे हा मुर्खपणा आहे. ज्याला जे शिकायचे आहे, जसे शिकायचे आहे, तसे त्याला शिकता आले पाहिजे. प्रत्येक व्यक्त्ती आपल्या इच्छेप्रमाणे शिकत असतो. ज्याला कारकून व्हायचे आहे तो कारकून होतो, ज्याला संशोधक व्हायचे आहे तो संशोधक होतो. हा प्रत्येकाच्या इच्छेचा भाग आहे.

शाळेपर्यंतचे एकवेळ ठिक, मात्र कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत हा नियम लावणे म्हणजे मुर्खपणाच म्हणावा लागेल. मेढ्यांच्या कळपांना हाकारावे तसे विद्यार्थ्यांना वागवणे अत्यंत चुकीचे आहे.
– शिरीष देशपांडे
S. N. D. T. विद्यापिठ,
पदव्युत्तर मराठी विभागप्रमुख.
{jcomments on}