काही दिवसांपूर्वी ‘लोणार सरोवरात सापडले मंगळावरील जीवाणू’ असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याला उत्तर म्हणून दिनांक 27 एप्रिल 2011 च्या लोकसत्तेतील वाचकांच्या सदरात पुण़्याच्या सूक्ष्मजीव संशोधन केंद्राचे श्रीकांत पवार यांनी एक पत्र लिहीले आहे. त्यांनी या पत्रात अत्यंत तपशीलवार आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने स्पष्टीकरण दिले आहे. मंगळावर पाठवण्यात आलेले यान अद्याप परतले नाही, असे असताना लोणार सरोवरात सापडलेला जीवाणू मंगळावरील असल्याचे सिद्ध होत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. या पत्रामुळे वाचकांच्या पत्रव्यवहाराला एकप्रकारचा भारदस्तपणा प्राप्त झाला आहे. अशाप्रकारच्या पत्रांमुळे हे सदर अधिक अर्थपूर्ण होत जाईल.
अशोक जैन
पत्रकार-लेखक
दिनांक – 27/04/2011
{jcomments on}


