वंशावळीचे जतन करणारा हेळवी समाज

62
464
carasole

दक्षिण महाराष्ट्राच्या सांगली, कोल्हापूर आणि साताऱ्याच्या ग्रामीण भागात ‘हेळवी’ हा जिव्हाळ्याचा व तितकाच आपुलकीचा आणि शहरांत कुतूहलाचा विषय आहे. ‘भारतीय’ या मराठी चित्रपटात मकरंद अनासपुरेने हेळ्व्याची भूमिका करून तो विषय सर्वांसमोर आणला.

हेळवी हा भटका समाज. मोकळे आकाश व विस्तीर्ण क्षितिज हे या हेळव्यांचे घर आणि नंदीबैल हा त्यांचा वाहतुकीचा प्राणी. त्या बैलावर संसाराचे ओझे घेऊन फिरणारे हेळवी सर्वांसाठी आकर्षणाचा विषय. कारण मोडी लिपी लिहिता-वाचता येणारी ही एकमेव भटकी जमात आहे. गावा गावांतील लोकांची वंशावळी सांभाळणे, त्यांत नवीन नावे घालणे, कुळांचा इतिहास नोंदवणे हा हेळव्यांचा परंपरागत व्यवसाय आहे. भारताच्या ग्रामीण व्यवस्थेत जसे गावगाडा चालवणारे आलुतेदार-बलुतेदार तयार झाले तसे गावातील लोकांची वंशावळ जतन करण्याचे काम हेळव्यांना खुद्द भगवान शंकरांनी दिले!

हेळव्यांचा नंदीबैल म्हणजे भलेथोरले जनावर. नंदीबैलाचे आकर्षण थोरामोठ्यांपासून लहानांपर्यंत आहे. अंगापिंडाने मजबूत असणारा पांढराशुभ्र नंदी सर्वांचेच लक्ष वेधून घेतो. हेळव्यांचा पोषाखही तसाच लक्षवेधी आहे. डोक्याला लाल, गुलाबी धनगरी फेटा, अंगात मांडचोळणा आणि धोतर, खांद्यावर उपरणे, पाय झाकण्यासाठी गुलाबी उपरणे (हेळवी वंशावळ सांगताना पाय झाकून घेतात. कारण त्यांच्या मतानुसार हेळव्यांचा मूळ पुरुष हा लंगडा होता.), हातात चांदीचे कडे, कानात कुंडले, पायात जोडव्या व चांदीचे तोडे असे हे हेळवी त्यांच्या बैलांनाही कायम सजवतात. नंदीबैलावर रंगीत चित्रांची काशिदीकारी केलेली झूल, शिंगांना रंगरंगोटी करून त्यांच्या टोकांना पितळी टोपडी आणि त्यांना रंगीबेरंगी गोंडे असतात. गळ्यात मोठ्या घंटेबरोबर लहान लहान घंटांच्या माळा. हेळवी बैलावर बसून गावात आले, की हां हां म्हणता सगळ्या गावात बातमी पसरते आणि त्यांना भेटायला एकच गर्दी उसळते. गावकरी प्रेमाने त्यांचे स्वागत करून त्यांच्या राहण्याची व नंदीबैलाच्या चाऱ्याची सोय करतात. हेळवीदेखील गावातील सर्वांना नावानिशी ओळखतात.

हेळवी साधारणपणे एखाद्या गावी यात्रेदरम्यान येतात. त्यामुळे शहरात गेलेली माणसेदेखील भेटतात. काही ठिकाणी पावसाळ्याआधी येतात. प्रत्येक हेळव्याकडे साधारणपणे दहा ते पंधरा गावे असतात. त्यातील काही त्यांची मुले सांभाळतात. प्रत्येक गावातील मूळ कुळांच्या वंशावळी व त्यांचा इतिहास हेळव्यांकडे असतो. गावात हेळव्यांची मुक्कामाची जागा ठरलेली असते. गावात आल्यानंतर ते एक महिनाभर तरी तेथे राहतात. त्यांच्या कुटुंबाची सोय लावून ते बैलांवरून घरोघरी फिरतात. प्रत्येक वाड्यावाड्यावर, वस्तीवर जाऊन प्रत्येक घरातील लोकांच्या समोर त्यांची वंशावळ चोपड्यांमधून हेळवी त्यांच्या खास आवाजाच्या ठेक्यात वाचून दाखवतात. ठेका पूजा करणाऱ्या ब्राह्मणांच्या ठेक्यासारखा जलद असतो. त्यामुळे नीट लक्ष देऊन ऐकल्याखेरीज बोलणे कळत नाही. साधारण एका कुळातील पंचवीस ते तीस पिढ्यांची नावे व त्यांचा इतिहास वाचून दाखवणे म्हणजे मोठी अवघड गोष्ट; त्यामुळे तसा ठेका नैसर्गिक आहे. प्रत्येक कुळाची माहिती सांगताना ते प्रथम त्या मूळाचा मूळपुरुष, मूळगाव सांगतात. एखादे कूळ कोणकोणती गावे बदलत बदलत केव्हा आज राहत असलेल्या गावी, का व कसे आले ते सांगतात. यात दिलेल्या तारखा शक कालगणनेनुसार असतात. वंशावळीतील पूर्वजांची जुन्या वळणाची नावे ऐकताना मोठे रंजक वाटते. पुढे हेळवी त्या कुळाचे गोत्र, प्रवर, ऋषिगोत्र, व्यवसाय, कुलदेवी इत्यादी रंजक माहिती सांगतात. वंशावळीतील नावे मूळपुरुषापासून ती आजच्या पिढीपर्यंत आणून सोडतात. त्यानंतर दक्षिणा म्हणून हेळवी धान्य घेतात. त्या आधारे घरात कोणाचे लग्न झाले आहे का? कोणाला मूल झाले आहे का? तसेच नवीन सून आली असेल तर तिचेही नाव वंशावळीत घालावे लागते. हेळवी स्त्रियांची नावे पूर्वीच्या वंशावळ यादीत घालत नव्हते; परंतु समान संपत्ती हक्क कायद्यानंतर हेळवी वंशावळयादीत मुलींची नावे घालू लागले आहेत. जुन्या वंशावळ यादीत एखादी स्त्री जर वारस असेल तर तिचे नाव पडते. एखाद्याचे नाव घालण्यासाठी हेळवी तांब्याची कळशी घेतात. लग्न, मुलाचा जन्म या नोंदींमुळे हेळव्यांचे उत्पन्न वाढते. लोक हेळव्यांच्या मागण्या आनंदाने पूर्ण करतात.

पूर्वी, हेळवी वंशावळींची नोंद असलेले ताम्रपट घेऊन फिरत असत. गावांची लोकसंख्या वाढली आणि ताम्रपटांचे ओझे घेऊन फिरणे अडचणीचे ठरू लागले. त्यामुळे हेळवी वंशावळींतील नोंद कापडी शिवणीच्या कागदांच्या चोपड्यांमध्ये ठेवू लागले. परंतु कागद लवकर जीर्ण होऊ लागताच त्यांच्या नक्कला नव्या चोपड्यावर करून ठेवतात. दक्षिण महाराष्ट्रातील हेळव्यांनी त्यांचे ताम्रपट एकत्रितपणे बेळगावला ठेवले आहेत. त्या ताम्रपटांची देखरेख करणाऱ्यांना गुरू म्हणतात.

मध्य महाराष्ट्रातील हेळवी व्यवस्था जवळ जवळ संपुष्टात आली आहे. काही ठिकाणी ती काही प्रमाणात चालू आहे. पूर्वी त्यांचे केंद्र कासेगाव, जि. सांगली हे होते. दक्षिण महाराष्ट्रातील हेळव्यांचे केंद्र बेळगाव (कर्नाटक) हे असून मूळस्थान चिंचणी हे बेळगाव जिल्ह्यातील गाव आहे. त्या गावी काही हेळव्यांना थोड्या फार जमिनी आहेत. हेळवी लोकांची मातृभाषा कन्नड आहे. हेळवी लोकांची मूळची जात धनगर ; परंतु सर्वांनी नंतर लिंगायत पंथ स्वीकारलेला आहे. त्यामुळे त्यांना मांसाहार वर्ज्य आहे; महाराष्ट्रातील काही हेळवी मात्र महाराष्ट्रीय लोकांच्या संगतीमुळे मांसाहार करू लागले आहेत, त्यामुळे त्यांना लिंगायत समाजात लग्नाकरता मुली मिळणे अडचणीचे ठरू लागले आहे. हेळव्यांना ते लिंगायत असल्यामुळे सोमवार हा त्यांचा पवित्रवार असतो. त्या दिवशी हेळवी कडक उपवास करतात व बैलाची पूजा करतात. ते सोमवारी बैलावर बसत नाहीत. हेळवी लोक त्यांचे आडनाव ‘हेळवी’ असेच लावतात. ग्रामीण भागात ज्या केसेसमध्ये वंशावळीची गरज लागते, तेथे हेळव्यांची साक्ष कोर्टग्राह्य धरली जाते.

हेळव्यांच्या काही समस्या आहेत –

१. शालेय शिक्षणाचे प्रमाण त्यांच्या सततच्या भटकंतीमुळे नगण्य आहे.

२. त्यांना जातींच्या सरकारी सवलती व योजना यांची माहिती नाही.

३. हेळवी समाज कर्नाटकात संघटित आहे ; परंतु महाराष्ट्रात तो संघटित नाही.

४. काही गावांचे हेळवी अकाली गेल्यामुळे त्या गावी दुसऱ्या हेळव्याची नेमणूक करणे गरजेचे आहे.

५. हेळवी परंपरा सांभाळण्यासाठी मुलगाच हवा या धारणेमुळे त्यांच्यात अपत्यांचा जन्मदर अधिक आहे. त्यामुळे त्यांच्यात प्रबोधन करणे गरजेचे आहे.

६. महाराष्ट्रात काही भागात दर पाच वर्षांनी राजस्थानातून भाट येतात आणि वंशावळीची नोंद ठेवतात, काही ठिकाणी त्यांचे येणे बंद झाले आहे. तेथे हेळव्यांची नेमणूक व्हावी.

७. हेळव्यांना कामात नवीन तंत्रज्ञानाची माहिती देऊन उपकरणे पुरवणे गरजेचे आहे.

दक्षिण महाराष्ट्रात हेळवी परंपरा भक्कम लोकाश्रयामुळे सुरळीत चालू आहे. त्यामुळे ती इतरत्र तशीच चालू राहवी याकरता प्रयत्न करणे गरजेचे आहे. माझ्या वंशावळीच्या शोधात मी अनेकदा हेळव्यांकडे गेलो त्यांनी माझा प्रेमाने पाहुणचार केला व माहिती पुरवली, त्याबद्दल मी मायप्पा हेळवी व बाबू हेळवी यांचा आभारी आहे.

– प्रणव पाटील

(मूळ लेख – त्रैमासिक ‘इतिहास शिक्षक’ .)

Last Updated on – 27th April 2016

About Post Author

62 COMMENTS

  1. यांना भेंटता येईल का
    यांना भेटता येईल का?

  2. अतिशय सुंदर माहिति मिळाली
    अतिशय सुंदर माहिती मिळाली.

  3. डाँ.दिलिप काशिनाथ मोहन विजयनगर ता.चांदवड जि.नाशिक

    हेळवी …खुपच छान माहीती .पण
    हेळवी… खूपच छान माहिती. पण आमचेकडे हल्ली भाट येतात. पूर्वी धान्य, गाय वगैरे घ्यायचे. हल्ली फक्त ३ अंकीच नाही तर ४ अंकी, ५ अंकीपर्यंत पैसे मागतात. खूप मोठा खजिना आपल्या हाती लागतो. ही प्रथा डिजिटल होणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या बरोबरच सरकार या घटकानेही लक्ष देणे हितावह ठरेल व संस्कृती टिकेल.

  4. मला वंशावळी ची माहिती हवी आहे
    मला वंशावळी ची माहिती हवी आहे. त्या संदर्भात मदत हवी आहे. हेळव्यांचा नं. मिळाला तर बर होईल.

  5. उत्तम माहिती आपण दिली आहे

    उत्तम माहिती आपण दिली आहे. आता हे लोक कुठे भेटतील? विशेष करून सांगली जिल्ह्यात.

  6. छान माहिती दिली आहे
    छान माहिती दिली आहे

  7. Pranav good information ,
    Pranav, good information, good work. keep it up. all the best for your future activities.

  8. नागरी लोकांना हेळवी समाज
    नागरी लोकांना हेळवी समाज फारसा माहितही नसेल, परंतु प्रणवचा हा शोधनिबंध वाचून वाचकांचं कुतूहल जागृत होईल व हिंदू समाजाची विविध अंगे जाणून घेण्याची प्रेरणा मिळेल. जिज्ञासा निर्मिती व तृप्ती हे उत्तम साधले आहे.

  9. प्रणव हेळवी समाजा विषयी
    प्रणव, हेळवी समाजाविषयी चांगली माहिती दिलीस.

  10. Good information. I want to
    Good information. I want to meet helvi. Pl inform me there location in Ahmednagar district.

  11. हेळवे समाजाची माहिती
    हेळवे समाजाची माहिती दिल्याबद्दल आपले खुप आभारी आहे.

  12. कुळ गोत्र ओंशाळी जात देव देवक
    कुळ गोत्र ओंशाळी जात देव देवक मुळस्थान जिल्हा सिंधुदुर्ग तालुका देवगड गाव पोंभुर्ले

  13. हेळवे समाज कोठे भेटेल
    हेळवे समाज कोठे भेटेल

  14. Far chagli mahiti milali paan
    Far chagli mahiti milali paan helvi cha contact no milala asta tar khup changle hoil maza no 9029218021 pls no dya

  15. मु.पो.बागनी ता.वाळवा जिल्हा…
    मु.पो.बागनी ता.वाळवा जिल्हा सांगली. या गावाची पूवँजवंशाची माहिती सांगनारा चे पूणँ नाव मोबाईल नंबर मिळावे.

  16. मि विजय ब मोहिते गाव ङाळज ता…
    मि विजय ब मोहिते गाव ङाळज ता ईदापुर जि पुणे मला वंशावळ कशी व कोठे मिळेल आणी त्यानचा नंबर मिळेल का

  17. मला वंशावळीची माहिती हवी आहे…
    मला वंशावळीची माहिती हवी आहे.तर त्या संदर्भात त्यांना भेटायचे आहे.तर त्यांचा पत्ता आणि contact No.आहे.

  18. खुप छान… माहिती दिली..मला…
    खुप छान… माहिती दिली..मला काहीच माहीत नव्हते…

  19. मला वंशावळी ची माहिती हवी…
    मला वंशावळी ची माहिती हवी आहे. त्या संदर्भात मदत हवी आहे. हेळव्यांचा नं. मिळाला तर बर होईल.

    मला खूप म्हणजे खूप गरज आहे plzz

  20. गाव-पाटण तालुका-पाटण जिल्हा…
    गाव-पाटण तालुका-पाटण जिल्हा-सातारा या गावचे वंशावळ माहिती कोणाकडे मिळेल माहिती असेल कोणाला तर contact number द्या हेळव्यांचा.

  21. मु.पो. ढालगाव कवठेमहाकाल…
    मु.पो. ढालगाव कवठेमहाकाल मिरज जिल्हा सांगली. या गावाची पूवँजवंशाची माहिती सांगनारा चे पूणँ नाव मोबाईल नंबर मिळेल का ?
    7208932414

  22. अप्रतिम माहितीसाठी धन्यवाद…
    अप्रतिम माहितीसाठी धन्यवाद.लोणी भापकर.ता.बारामती.जिल्हा.पुणे.चे हेळवींचा पत्ता व संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिल्यास उपकृत व्हावे. आदिनाथ कांबळे.

  23. लोणी भापकर.ता.बारामती.जिल्हा…
    लोणी भापकर.ता.बारामती.जिल्हा,पुणे.वंशावळ असणारे हेदवींचा पत्ता व नंबर उपलब्ध व्हावे.ही विनंती. ं

  24. मी हेळवी आहे 9172372577
    मी हेळवी आहे 9172372577

  25. sir,
    majyakade helvi kunbi…

    sir,
    majyakade helvi kunbi nondhi aahe tr sir ti nondh obc caritificate sathi chalel kay

  26. नमस्कार सर तुम्ही दिलेली…
    नमस्कार सर तुम्ही दिलेली माहित खरंच छान आहे ज्यामुळे मला हेळवी समाजाची माहिती मिळाली माझी आपणास विनंती आहे कि मला या हेळवी समाज आता कुठे स्तिथ आहे आणि त्यांच्याशी कशा पद्धतीने संपर्क होऊ शकेल

  27. Very nice and helpful…
    Very nice and helpful information. Can I get contact details of helvi of belgaum/ Kolhapur?

  28. महाबळेश्वर च्या माहिता…
    महाबळेश्वर च्या माहिता कोणाकडे भेटल ९००४७४२७६२

  29. Mala हेळवी पाहिजे
    हेळवी समाजाबद्दल माहिती पाहिजे.

  30. फारच छान. Dist : Sangli…
    फारच छान. Dist : Sangli Taluka :Shirala
    Mukkam post : Takve

    ही प्रथा डिजिटल होणे आवश्यक आहे. वंशावळ माहिती कोणाकडे मिळेल माहिती असेल कोणाला तर contact number द्या हेळव्यांचा.

  31. Plz mala सन्घोला.बुधाल…
    Plz mala सन्घोला.बुधाल.जुनूनी.गावचा हळवी चा no paijhe ahi plz kana kady ahi kay plz plz plz shir kar my no 7798366683

  32. Mi hi vanshaval digital…
    Mi hi vanshaval digital karnya sathi icchuk ahe, konach contact no bhetla re bara hoil, mi ani mazi purn team he kam karu shakto. Please asel kona helvi cha contact tr dya..

  33. मला माझा भाट कोण आहे हे कस…
    मला माझा भाट कोण आहे हे कस समजु शकेल

  34. यांचा contact no मिळाला तर…
    यांचा contact no मिळाला तर बर होईल
    9822408344

  35. हेळवी हा माझा धर्म आहे मी हे…
    हेळवी हा माझा धर्म आहे मी हे बंद पडु देणार नाही हे असेच वंशावळ जपुन मी मोडी लिपी मध्ये चालु ठेवणार

  36. चदगड ( तालुका ) येथील नांगरे…
    चदगड ( तालुका ) येथील नांगरे वशावळीची माहीती हवी आहे कृपया हेळव्याचा contact no मिळू शकेल का

  37. पेड ता तासगाव जी सांगली…
    पेड ता तासगाव जी सांगली हेळवीचा नंबर हवा आहे

  38. माझे गाव निगडी ता. कराड जि…
    माझे गाव निगडी ता. कराड जि. सातारा
    आमच्या गावाच्या हेळवी त्याचे नाव व फोन नंबर मिळेल का? माझा नंबर 8888279527

  39. आम्हाला वंशावळी ची माहिती…
    आम्हाला वंशावळी ची माहिती हवी आहे. त्या संदर्भात मदत हवी आहे. हेळव्यांचा नं. मिळाला तर बर होईल.
    आमचा नंबर — 9869330786 / 9867023720
    8652330786

  40. मला वंशावळी संदर्भात माहिती…
    मला वंशावळी संदर्भात माहिती हवी आहे,माझे गाव विघ्रवली ता संगमेश्वर जि रत्नागिरी.
    मला ही माहिती कुठून मिळेल?काही सोर्स असल्यास सांगा किंवा कोणत्या हेलवी कडून मिळेल त्यांचा नंबर असल्यास द्यावा.

  41. मला वंशावळ ची माहिती पाहिजे…
    मला वंशावळ ची माहिती पाहिजे कोणाकडे मिळेल मोबाईल नं असल्यास द्या वा माझा मोबाईल नं 7020886759

  42. मौजे-नाडोली ता. पाटण जि…
    मौजे-नाडोली ता. पाटण जि. सातारा येथील पवार घराण्याची वंशावळ कोणाकडे मिळेल

  43. फारच सुंदर माहिती,
    आपल्या…

    फारच सुंदर माहिती,
    आपल्या पूर्वजांची माहिती मिळणे म्हणजे सध्या भाग्यंच आहे

  44. संगणकीय साठवणूक होणे गरजेचे…
    संगणकीय साठवणूक होणे गरजेचे आहे

  45. Very Nice Information, …
    Very Nice Information, Indeed this is beneficial to all.. Keep going.
    I shall be obliged if youCan provide me number of Any Helavi so as to contact him.
    Thanks

  46. माल्या पत्नीच्या माहेरच्या …
    माल्या पत्नीच्या माहेरच्या जमीन वादा साठी तिच्या चुलत आजोबाची वंशावली अत्यंत महत्वाची आहे कृपया सहकार्य करावे हि विनंती

  47. मला वंशावळी ची माहिती हवी…
    मला वंशावळी ची माहिती हवी आहे. त्या संदर्भात मदत हवी आहे. हेळवे समाज कोठे भेटेल?

  48. माझ गाव यळगुड जिल्हा…
    माझ गाव यळगुड जिल्हा कोल्हापुर तालुका हातकंगले मला काटकर घरान्याची माहिती हवी आहे पूर्ण सगळी लवकर मिळाली तर बरे होईल या घरचा हेळवी कोण होता त्याचे नाव आणि मोबाइल नंबर भेटला तर बरे होईल

  49. बेळगाव येथे कोणत्या ठिकाणी…
    बेळगाव येथे कोणत्या ठिकाणी ताम्रपट एकत्रितपणे ठेवले आहे. मला कसे कळेल आमच्या घरी कोण हेळवी येत असे. गेली ३० वर्षे आमच्या गावात कोणी हेळवी येत नाही आहे.

  50. मला माझी वंशावळ माहीत करून…
    मला माझी वंशावळ माहीत करून घायची आहे

  51. मला निरा गावतील हेळवीं बद्दल…
    मला निरा गावतील हेळवीं बद्दल माहिती पाहिजे होती…मला वंशावळ कढ़ाय ची आहे
    ९६०४२९६२२२

  52. कोकणात राहणाऱ्या लोकांची…
    कोकणात राहणाऱ्या लोकांची वंशावळ कोणाकडे मिळेल

  53. निरा गवतील हेलविंचा नंबर…
    निरा गवतील हेलविंचा नंबर असेल तर पाठवा…
    96042 96222 या नंबर वर

Comments are closed.