प्रस्तावीत लोकपाल विधेयकाबद्दल सध्या अनेक ठिकाणांहून नकारात्मक सूर ऐकू येत आहे. ही गोष्ट म्हणजे, एखादे मूल जन्माला यावे आणि त्याच्या जन्मामुळे आता अनेक वाईट गोष्टी….
प्रस्तावीत लोकपाल विधेयकाबद्दल सध्या अनेक ठिकाणांहून नकारात्मक सूर ऐकू येत आहे. ही गोष्ट म्हणजे, एखादे मूल जन्माला यावे आणि त्याच्या जन्मामुळे आता अनेक वाईट गोष्टी घडणार आहेत, असे भाकित करण्यासारखे आहे. या विधेयकाला स्वत:चे रूप धारण करण्याचा वेळ दिला जावा असे मला वाटते
मतदान केल्यानंतर पुढील पाच वर्ष मतदाराला सरकारच्या कोणत्याच निर्णयात आवाज नसतो, या केजरीवाल यांच्या मुद्यात तथ्य आहे. सरकारच्या निर्णयात जनतेचा सहभाग असणे गरजेचे आहे आणि त्यामुळे संसदेच्या हक्कांवर गदा येते, असेही समजण्याचे कारण नाही. याकरिता लोकप्रतिनिधी आणि जनतेतील संवाद वाढणे गरजेचे आहे.
गेल्या दोन महिन्यात अरूणा शानबाग आणि अण्णा हजारेंमुळे राष्ट्रीय पातळीवर सर्वसामान्य जनतेत बरीच चर्चा घडली. जनतेने आपली मते मांडणे, विचार व्यक्त करणे यातूनच लोकशाही सुदृढ होत असते आणि या घटना त्यास पूरक ठरल्या.
शरद देशपांडे
पुणे विद्यापिठ,
निवृत्त तत्त्वज्ञान विभागप्रमुख
{jcomments on}