अमेरिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईत मोस्ट वॉन्टेड दहशतवादी ओसामा बिन लादेन ठार.
अमेरिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईत मोस्ट वॉन्टेड दहशतवादी ओसामा बिन लादेन ठार झालेला असला तरी जगावरील दहशतवादाचा धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही. कारण या कारवाईदरम्यान लादेनपेक्षाही धोकादायक असलेला कर्नल गदाफी निसटण्यात यशस्वी झाला.
अलकायदापासून जगातल्या सर्व लहानमोठ्या दहशतवादी संघटनांना पैसा पुरवण्यामागे कर्नल गदाफीचा हात आहे. त्याच्याकडे एवढी विनाशकारी शस्त्रसामग्री आहे, की तो तब्बल 14 वेळा पृथ्वीची राखरांगोळी करू शकतो. लिबीयाचा गेल्या 30 वर्षांचा इतिहास पाहिला तर सर्वात धोकादायक व्यक्ति म्हणून गदाफीचेच नाव पुढे येते.
या कारवाईत गदाफीची मुले-नातवंडे बळी पडली आणि तो याचा नक्कीच प्रतिशोध घेईल, मात्र जगाला हा लादेनच्या मृत्यूचा प्रतिशोध आहे, असेच वाटेल. लादेन बुद्धीबळाच्या पटलावरचा फक्त वजीर होता, खरा राजा गदाफीच आहे. यानंतर गदाफीकडून लवकरात लवकर दहशतवादी कारवाई करण्याची शक्यता असून तो माद्रीद (स्पेन) किंवा इटली (रोम) या ठिकाणी हल्ला करू शकतो.
शिरीष देशपांडे
S. N. D. T. विद्यापिठ,
पदव्युत्तर मराठी विभागप्रमुख
{jcomments on}


