– अरूण साधू
रामदेवबाबांनी भ्रष्टाचाराविरूद्ध सुरू केलेले उपोषण म्हणजे एक फार्स आहे. गांधीजी जर रामदेवबाबांच्या जागी असते, ..
– अरूण साधू

रामदेवबाबांनी भ्रष्टाचाराविरूद्ध सुरू केलेले उपोषण म्हणजे एक फार्स आहे. गांधीजी जर रामदेवबाबांच्या जागी असते, तर असे वागले नसते. त्यांनी सरकारला दिलेली आश्वासने मोडली. त्यांच्या बोलण्यात अजिबात ताळतंत्र नव्हते. देशाच्या दृष्टीने रामदेवबाबांचे हे उपोषण हानिकारक आहे. सरकारने या प्रकारे निर्णय घेऊन त्यांच्याविरुध्द कारवाई करणे गरजेचेच होते. मात्र सरकारने उपोषणाचा हा प्रयत्न सुरू होण्यापूर्वीच मोडून काढायला हवा होता.
– अरूण साधू,
ज्येष्ठ पत्रकार-लेखक
– (022) 26592528, 9869429893
About Post Author
अरुण साधू हे मराठी समाजात खोलवर रुजलेले लोकप्रिय लेखक होते. त्यांनी मराठी साहित्यास नवे वळण दिले. त्यांनी वर्तमान काळातील संदर्भांतूनही स्थायी मूल्ये प्रकट करता येऊ शकतात हे दाखवून दिले. त्यांच्या ‘मुंबई दिनांक’पासून ‘मुखवटा’पर्यंतच्या कादंबऱ्या व ‘चे गव्हेरा आणि क्रांती’पासून ‘रशियन क्रांती’पर्यंतचे वैचारिक लेखन यांमधून त्यांची प्रज्ञा व प्रतिभा सार्थपणे व्यक्त होते. त्यांनी चरित्रात्मक लेखनही इंग्रजी-मराठीतून केले. त्यामुळे त्यांची साहित्यसंमेलनाध्यक्ष म्हणून नागपूरला निवड सहज झाली. त्यांनी पुणे विद्यापीठातील वृत्तपत्रविद्या विभागाचे (रानडे इन्स्टिट्यूट) प्रमुख पद काही वर्षें सांभाळले. ते व्यवसायाने पत्रकार होते. अरुण साधू यांचे निधन अल्पशा आजाराने २५ सप्टेंबर २०१७ ला काहीसे अचानक झाले. त्यांनी पत्रकारितेतही उच्च स्थान मिळवले. त्यांच्या हाताखाली अनेक जागरूक पत्रकार तयार झाले.